दौंड येथे शिवसेनेचा “ पर्यावरण रक्षा , जीवन सुरक्षा ” या संकल्पनेसह ‘जागतिक पर्यावरण दिन’ साजरा !

दौंड :- आलिम सय्यद
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त (५ जून) रोजी प्राथमिक आरोग्य केंद्र देऊळगाव राजे येथे शिवसेना दौंड चे वतीने तालुक्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रावरील आरोग्य अधिकारी ,आशा सेविका, परिचारिका, आरोग्य अधिकारी यांचे कोरोना लढाईतील योगदानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी “ पर्यावरण रक्षा , जीवन सुरक्षा ” या संकल्पनेसह जागतिक पर्यावरण दिना निमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

दौंड विधानसभा मतदार संघातील शिवसेनेचे माऊली आहेर , प्रशांत जगताप यांच्या वतीने जिल्हाप्रमुख महेश पासलकर यांचे हस्ते आशा सेविका, परिचारिका,आरोग्य अधिकारी, ग्रामस्थ देऊळगाव राजे यांना वाफेच्या मशीन व वृक्ष वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हाप्रमुख महेश पासलकर म्हणाले की, कृत्रिम ऑक्सिजन अभावी कोरोना महामारी मध्ये देशाच्या आरोग्य यंत्रणेचे वाभाडे निघाले. पर्यावरणाची गुणवत्ता वाढवणे, पर्यावरण संवर्धना विषयी जागरूकता निर्माण करणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असून, आपल्याला आयुष्यभर पुरेल इतक्या नैसर्गिक ऑक्सिजनची सोय प्रत्येकाने वृक्ष लागवड करून वृक्ष संवर्धन व संगोपणाने करायलाच हवी.
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेखा पोळ, देऊळगाव राजे प्राथमिक आरोग्य केंद्र प्रमुख डॉ.सुमित सांगळे आशा सेविका व्यवस्थापक अनिता अवचर, जेष्ठ परिचारिका महांकाळे ,माऊली आहेर, प्रशांत जगताप, शंकर शितोळे , शिवसेना महिला तालुका संघटक छाया जगताप, शिवसेना डॉक्टर सेल तालुका प्रमुख डॉ.प्रमोद रंधवे, शिवसेना उपतालुका प्रमुख नवनाथ जगताप, शिवसेना विभाग प्रमुख हनुमंत निगडे, अभिजित डाळिंबे, देऊळगाव राजे ग्रामपंचायत सदस्य बाबूराव पासलकर ,पोपट खोसरे, देविदास ढवळे, रामभाऊ दुधाट, शामराव अवचर ,बापू डाळिंबे, व इतर शिवसैनिक पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!