कुरकूंभ येथे सेवा निवृत्त सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक अधिकारी प्रभाकर बनकर यांचा सन्मान करण्यात आला

दौंड :- आलिम सय्यद

कुरकूंभ येथे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कार्यरथ असताना केलेल्या कामाची पावती म्हनुण कुरकूंभ ग्रामपंचायत यांच्या वतीने प्रभाकर बनकर यांचा पोलीस विभागातून सेवा निवृत्त झाल्याने सन्मान करण्यात आला बनकर हे कुरकूंभ येथे कार्यरथ असताना पुणे सोलापुर महामार्गावर्ती होणारे आपघात त्या मध्ये अनेक अपघात झाले यामध्ये अनेक वाहन चालक, नागरिक यांचा प्राण वाचवले तसेच या परिसरामध्ये काम करताना जनता आणी पोलीस यांच्यामध्ये सलोख्याचे नाते जोपासले कुरकूंभ मधील नवरात्र उत्सवामध्ये चोक असा बंदोबस्त केला सर्व धर्म समभाव अशी वागणुक देऊण सर्वाना समवेत घेऊन कामकाज केले व कुरकूंभ पोलीस मदत केंद्र भव्य इमारत यांच्या प्रयत्नातुन झाली तसेच पुढील वाटचालीस शुभेच्छा यावेळी कुरकूंभ व परिसरातील नागरिकांनी दिल्या कार्यक्रंमाचे आयोजन कुरकूंभ ग्रामपंचायतने केले. या वेळी सरपंच राहुल भोसले,कुरकूंभ ग्रामपंचायत सदस्य विजय गिरमे, आयुब शेख, माझी उपसरपंच सुनिल पवार,संजय जाधव, भाजपा जिल्हा कार्यकरते सनिभाई सोनार, पोलीस हवालदार मारूती हिरवे, श्रीरंग शिंदे , राकेश फाळके,पांढरेवाडीचे पोलीस पाटील विलास येचकर, दौंड तालुका आर पी आय युवा अध्यक्ष नवनाथ गायकवाड़, रफिक शेख, युवराज दोडके, सोमनाथ गायकवाड,जावेद मुलाणी तसेच कुरकूंभ व परिसरातील ग्रामस्थ उपस्थित होते. या कार्यक्रमाप्रसंगी सन्मानाबद्दल प्रभाकर बनकर यांनी गावकरी व ग्रामपंचायत कुरकुंभ यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!