
कुरकुंभ औद्योगिक वसाहत चा विकास शेतकऱ्यांच्या गळ्याला गळफास..
दौंड -पुणे :- आलिम सय्यद
दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहत मधील कंपन्यांमधून तसेच सी इ टी पी प्रकल्पामधून दूषित केमिकल युक्त सांडपाणी पांढरेवाडी गावातील मोहन रामचंद्र कुलंगे, व उत्तम जयवंत कुलंगे यांच्या शेतातून केमिकलयुक्त सांडपाणी अनेक वर्ष यांच्या शेतातून वाहतंय या दूषित सांडपाण्याने शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय या सांडपाण्याच्या त्रासाला कंटाळून अखेर पांढरेवाडी गावातील उत्तम कुलंगे व मोहन कुलंगे यांच्या कुटुंबाने दौंड तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण करण्याचा पाऊल उचलला आहे.
कुरकुंभ औद्योगिक वसाहत मधील कंपन्यांकडून व सी.ई.टी.पी प्लांट मधून सोडलेलं केमिकल युक्त दूषित सांडपाणी हे आमच्या शेतात येत असल्याने आमची शेतजमीन पूर्णपणे नापीक झालेल्या आहेत. त्यामुळे आमच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला असून शेतजमीन खराब झालेबाबतचे पुरावे घेऊन अनेक वेळा एम.आय.डी. सी कार्यालय , महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, तहसील कार्यालय दौंड, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांना वारंवार तक्रार करूनही तक्रारीची आजतागायत दखल घेण्यात आली नसल्याने शासनाचे याकडे दुर्लक्ष राहिले एकीकडे पूर्णतः नापीक झालेली शेतजमीन व दुसरीकडे कोरोना महामारी यामुळे सहनशीलता आता शिगेला पोहचली. कारण आताही त्या दूषित रसायनयुक्त खराब पाण्याने आमची शेती तुडुंब भरलेली असून संबंधित कंपन्या व सी. ई. टी. पी. प्लांटमधून सोडल्या जाणाऱ्या रसायनयुक्त दूषित पाण्यामुळे आमचे कधीही भरून न निघणारे अतोनात नुकसान झाले आहे तसेच याचे दुष्परिणाम आताच्या व पुढील पिढ्यांना भोगावे लावणार आहे. या आमच्या शेतीमधील फळझाडे जागीच जळून गेली आहेत त्याचीही दखल घेतली जात नाही. तरी कंपन्या व सी. ई. टी. पी प्लांटमधून रसायनयुक्त सांडपाणी आमच्या शेतजमीनत सोडल्यामुळे आमच्या शेतजमिनीचे जे नुकसान झाले आहे त्याची आजतागायतची नुकसान भरपाई आम्हास मिळावी व येथून पुढे आमच्या शेतात सांडपाणी सोडू नये सदर कंपन्यांनी बेकायदेशीरपणे दूषित सांडपाणी सोडल्यामुळे होणाऱ्या नुकसानीची भरपाई मिळावी याबाबत या शेतकऱ्यांनी कुटुंबासह दौंड तहसील कार्यालय समोर आमरण उपोषण सुरू केले आहे.
या शेतकऱ्यांना या आमरण उपोषणाला दौंड रिपब्लिक सेनाने जाहीर पाठिंबा दिलाय तर या उपोषण कर्त्यांना राष्ट्रवादी काँगेसचे दौंड तालुका अध्यक्ष अप्पासाहेब पवार यांनी भेट देऊन या उपोषण कर्त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी याबत पाठपुरावा करून न्याय देण्याचे आश्वासन यावेळी उपोषण कर्त्यांना पवार यांनी दिले