
पुर्व हवेली – शिरुर करीता पुणे महानगर विकास आराखडा विरोधी कृती समिती स्थापण – पै.संदीप भोंडवे
कोरेगाव भीमा : प्रतिनिधी(विनायक साबळे) :
2 ऑगस्ट रोजी जाहीर करण्यात आलेल्या पुणे महानगर विकास आराखड्यामध्ये असलेल्या असंख्य चुका शासनाच्या लक्षात आणुन देण्यासाठी वेळेप्रसंगी त्या विकास आराखड्याच्या विरोधात पीएमआरडी विरोधात कंबर कसण्याची पुर्व हवेली – शिरुर तालुक्यातील सर्व गावे एकत्रित करुन मा.श्री. प्रदीपदादा कंद यांच्या अध्यक्षतेखाली कृती समिती स्थापण करण्यात आल्याची माहीती कृती समितीचे सरचिटणिस पै. संदीप भोंडवे यांनी दीली .
23 ऑगस्ट रोजी पेरणे टोल नाक्याशेजारी समाज प्रबोधन केंद्रामध्ये पुर्व हवेली – शिरुर करीता पुणे महानगर विकास आराखडा विरोधी कृती समिती स्थापण करण्यासाठी बैठक बोलविण्यात आली होती त्या बैठकीमध्ये मा. प्रदीपदादा कंद यांनी बोलताना सांगितले की मी ज्यावेळी पुणे महानगरचा सदस्य होतो त्यावेळी झालेल्या 2/3 बैठकीत सुचविलेल्या विविध पर्यायापैकी कोणताच पर्याय नव्याने जाहीर झालेल्या विकास आराखड्यात दीसत नाही. हा विकास आराखडा पुढील 50 वर्ष डोळ्यासमोर ठेऊन केला गेलेला आहे असे जरी भासविण्यात आले असले तरी हा सर्वसामान्य व्यक्ती व शेतक-यांचे कुटुंब उध्दवस्त करणारा ठरणार आहे त्यासाठी सर्वांनी पक्षविरहीत एकत्र येऊन त्यास विरोध करणे गरजेचे आहे असे मत व्यक्त केले . विकास आराखडा विरोधी कृती समितीचे सरचिटणिस पै. संदीप भोंडवे यांनी सुचना करताना सांगितले की मोजकीच 5 ते 6 गावे सोडुन इतर कोणत्याच गावात कोठेच शेती व्यतिरिक्त झोनिंग झालेले नाही त्यामुळे यास विकास आराखडा म्हणतात येणार नाही या चुकीच्या आराखड्याचा फटका पुढील 2 पिढ्यास बसणार असुन आजच सर्वांनी एकत्र येऊन त्यास विरोध करणे गरजेचे आहे असे सुचविले . वाडेबोल्हाई चे सरपंच दीपक गावडे म्हणाले की आमचे गाव रींग रोड , पुणे नाशिक रेल्वे ने बाधित झाले असुन खुप जमिन या दोन प्रकल्पासाठी जात आहे शिवाय पुण्याच्या शेजारी असुन ही आमचे गाव R झोन पासुन वंचित आहे त्यामुळे या विकास आराखड्यास भकास आराखडा म्हणावा लागेल . पिंपरीसांडस चे सरपंच राजेंद्र भोरडे म्हणाले की रींग रोड परीसरात पुढील 50 वर्षात खुप मोठी वसाहत होणार असुन पुर्व हवेली मधील सर्वच गावामध्ये एकुण क्षेत्रफळा पैकी 60 ते 70 टक्के क्षेत्र आर झोन होणे अपेक्षित होते परंतु मोजकी 4 गावे सोडली तर खालील कोणत्याच गावात आर झोन झाला नाही . शिरसवडी चे माजी सरपंच बाळासाहेब औताडे म्हणाले की या विकास आराखड्यास विरोध करताना वेळप्रसंगी कोर्टाचे दरवाजे खटखटावे लागले तरी चालेल परंतु सर्वांच्या भविष्यासाठी ठाम विरोध करणे गरजेचे आहे . प्रल्हाद वारघडे , श्रीमंत झुरुंगे, माऊली शिवले , माऊली ठोंबरे , डाॅ . जगताप यांनी आपल्या भाषणात विकास आराखड्यास विरोध केला .
या बैठकीस माऊली शिवले , प्रकाश शिवले , अमोल शिवले , संजय चव्हाण , कीरण साकोरे, भानुदास साकोरे, प्रल्हाद वारघडे, वाल्मिक भोंडवे , नवनाथ पोटफोडे , रविंद्र कंद , श्रीमंत झुरुंगे , डाॅ जगताप , रविंद्र वाळके , दशरथ वाळके , शामराव शिंदे , संतोष गायकवाड , विक्रम गायकवाड , अनिल गायकवाड, माऊली ठोंबरे , गणेश बाजारे , संतोष पवळे , राजेंद्र गुंड , राजुआण्णा भोरडे , दीपक लोणारी , विपुल शितोळे , भाऊसाहेब शिंदे , विकास तळेकर , मोतीराम लकडे ,स्वप्निल लोले , नरसिंग लोले ,सचिन कोतवाल , गोते , सरपंच गावडे , माजी सरपंच बाळासाहेब औताडे व इतर उपस्थित होते . बैठकीचे सुत्र संचालन सांगवी चे ग्रा . सदस्य भाऊसाहेब शिंदे यांनी केले .