
विस्तार अधिकारी सचिन भाकरे यांचा कोरोना योद्धा म्हणून सन्मान..
शेवगाव प्रतिनिधी युनूस शेख
कोरोना महामारीच्या कठीण काळात पंचायत समिती शेवगाव येथे विस्तार अधिकारी पदी उत्कृष्ट कार्य करत शेवगाव तालुक्यातील सर्वसामान्य नागरिकांना सन्मानाची वागणूक देवुन त्यांच्या अडीअडचणी जाणून घेऊन अडचणी सोडवण्यासाठी सदैव तत्परतेने नागरिकांचे अडचणी दूर करण्यास प्राधान्य देण्याबरोबरच तालुक्यातील दिव्यांग बांधवांना सुद्धा मदतीचा हात सतत पुढे असणारे विस्तार अधिकारी भाकरे यांनी कोरोना काळात केलेल्या कामाची दखल घेऊन सावली दिव्यांग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब महापुरे,उपाध्यक्ष चाँद शेख,सचिव नवनाथ औटी व शिष्टमंडळाने कोरोना योद्धा म्हणून 15 ऑगस्ट 2021 स्वातंत्रदिनी अमृतमहोत्सच्या निमित्ताने विस्तार अधिकारी सचिन भाकरे यांना सन्मानीत करण्यात आले.यावेळी,पिंगेवाडी येथे कार्यरथ असलेले ग्रामसेवक सुनील राठोड,राक्षी येथे कार्यरथ असलेले ग्रामसेवक देविदास पंडित यांनाही सावली दिव्यांग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांच्या हस्ते कोरोना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले.यावेळी सावली संस्थेचे अध्यक्ष बाबासाहेब महापुरे,उपाध्यक्ष चाँद शेख,
सचिव नवनाथ औटी,सावली दिव्यांग संघटनेचे उपाध्यक्ष संभाजी गुठे,कार्याध्यक्ष मनोहर मराठे,संघटक खलील शेख,
सोशल मीडिया प्रमुख बाबासाहेब गडाख,शहरअध्यक्ष गणेश महाजन,शहरउपाध्यक्ष सुनील वाळके,शहरसचिव गणेश तमानके,शिवाजी आहेर,अशोक गायके,बंडू गमे,संभाजी मुळे, सुदाम मातडे,भीमा बडे,निलोफर शेख,मीनाताई कळकुंबे,संतोष पावसे,बाळासाहेब फटांगडे,
संदीप धुत,बंडूसेठ रासने,राक्षीचे सरपंच रंजनाताई कातकडे यांच्यासह ग्रामस्थ तसेच दिव्यांग बांधव उपस्थित होते.