युपीएससी परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल श्रीकांत विसपुते यांचा फैजपूरात सत्कार

राजु तडवी फैजपुर

फैजपूर प्रतिनिधी: फैजपूर चे सुपुत्र व परभणी येथे नायब तहसीलदार म्हणून कार्यरत असलेले श्रीकांत विसपुते हे केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) परीक्षेत उत्तीर्ण झाल्याबद्दल त्यांचा परिवासह आज फैजपूर येथे रहात्या घरी नारीशक्ती गृप व विविध पदाधिकारींच्या वतीने सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी श्रीकांत विसपुतेंच्या रुपाने आपल्या फैजपूर शहराचा पुन्हा एकदा देशभरात नावलौकिक पसरला असुन त्यांचे हे यश भावि पिढीसाठी निश्चितच प्रेरणादायी ठरेल असे प्रतिपादन नारीशक्ती अध्यक्षा दिपाली चौधरी झोपे यांनी केले. आपल्या फैजपूर शहराचे ऋण कधीही विसरणार नसून येथील विद्यार्थ्यांना मार्गदर्शनासाठी नेहमीच प्रयत्न करेल असे प्रतिपादन सत्काराला उत्तर देताना श्रीकांत विसपुते यांनी केले.
या छोटेखानी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व विसपुते परिवाराविषयी थोडक्यात परिचय मुख्याध्यापक गणेश गुरव सर यांनी करुन दिला.यावेळी श्रीकांत विसपुते व त्यांच्या आई-वडीलांसह खान्देश नारीशक्ती फाऊंडेशन अध्यक्षा व भाजपा ओबीसी मोर्चाच्या सौ.दिपाली चौधरी झोपे, मुख्याध्यापक गणेश गुरव सर, राष्ट्रवादी काँग्रेसचे सामाजिक न्याय शहराध्यक्ष अशोक भालेराव, कृषी पदवीधर युवाशक्ती संघटना तालुकाध्यक्ष अक्षय धांडे, खान्देश फाऊंडेशन चे संदिप पाटील, नारीशक्ती सदस्या सौ.भारती पाटील,भाविल पाटील,राजु साळी,श्री.मोरे काका, राजु भाऊ विसपुते यांच्यासह विविध पदाधिकारी, मान्यवर व नातेवाईक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!