
भिवंडीत मॅरेज हॉलला आग,आगीत २० ते २५ दुचाकी वाहने जळून खाक..
संजय कदम ठाणे
भिवंडीत लागलेल्या या आगीत २० ते २५ दुचाकी वाहने जळाली असून अग्निशमनदलाच्या अथक प्रयत्नांनी दीड तासानंतर आगीवर नियंत्रण मिळाले आहे.
या मॅरेज हॉलमध्ये लग्नसमारंभ सुरु होता. यादरम्यान वाहन पार्किंगच्या ठिकाणी असलेल्या मोकळ्या जागेत फटाके लावले होते. फटाक्यांची आतिषबाजी करताना मंडपाला आग लागली. त्यानंतर हळूहळू ही आग पसरून वाहन पार्किंग ठिकाणी असलेल्या सुमारे २० ते २५ दुचाकी जळून खाक झाल्या आहेत. सुदैवाने या आगीत कोणतीही जिवित हानी झाली नाही. अग्निशमन दलाच्या दीड दोन तासांच्या अथक प्रयत्नांनी आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले असून स्थानिक पोलीस ठाण्यात या आगीची नोंद करण्यात आली आहे.
भिवंडीत मोकळ्या जागेत अनेक व्यावसायिकांनी अशा प्रकारे मॅरेज हॉल थाटले आहेत. मात्र सुरक्षेच्या कोणत्याही उपाययोजना केल्या नसल्याने भविष्यात जीवितहानी होण्याची मोठी दुर्घटना होण्याची शक्यता वर्तविण्यात येत असून मनपा प्रशासन त्याकडे लक्ष देणार का असा सवाल उपस्थित होत आहे.
आणखीन काही महत्त्वाचे
शेवगाव शहरातील टपरी धारकांचे तत्काळ पुनर्वसन करा कॉ. संजय नांगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस
शेवगाव प्रतिनिधी सविस्तर वृत्त असे की शहरातील प्रमुख राज्य महामार्गावरील अतिक्रमण हटाव मोहिमेत विस्थपित झालेल्या व्यापाऱ्यांचे प्रशासनाने तातडीने पुनर्वसन करावे...
चाइल्ड करीअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चा नवरंग कला महोत्सव 2025
चाईल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन ठरले लक्षवेधी. नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथील गुणवत्ता संस्कार संस्कृती व...
शेवगांव तालुक्यात राजरोस अफुची शेती अफुच्या झाडाची बेकायदेशिर रित्या लागवड..
शेवगांव तालुक्यात राजरोस अफुची शेती अफुच्या झाडाची बेकायदेशिर रित्या लागवड करणा-या आरोपीस साडेअकरा लाख किंमतीच्या मुद्देमालासह गणेश नवनाथ घोरतळे या...
मढी ग्रामपंचायत सदस्यांची सदस्यता रद्द करण्याची एमआयएमची मागणी
लोकप्रतिनिधी कायदया अंतर्गत सदस्यता रद्द करा - डॉ परवेज अशरफी नगर - सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात तसेच ज्या...
तालुकाध्यक्षपदी अशोकराव मोरे यांची निवड..
नेवासे शहर ता.04 अंमळनेर येथील सामजिक कार्यकर्ते अशोकराव मोरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित दादा गटाच्या) नेवासे तालुकाअध्यक्षपदी निवड करण्यात...
चाइल्ड करिअर इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरुौर्णिमा उत्साहात साजरी..
चाइल्ड करिअर इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरुौर्णिमा उत्साहात साजरी नेवसा तालुक्यातील सलाबतपुर येथील चाईल्ड करिअर इंग्लिश मिडीयम...