
पांढरेवाडी गावचे उपसरपंच पदी रोहिणी बनकर यांची निवड
दौंड:- आलिम सय्यद
दौंड तालुक्यातील पांढरेवाडी गावच्या उपसरपंच पदी रोहिणी नवनाथ बनकर यांची निवड झाली.
सुवर्णा चंद्रकांत झगडे यांनी आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिल्याने रिक्त उपसरपंचपदाच्या जागेसाठी शनिवार ( ता.२७ ) रोजी पांढरेवाडी ग्रामपंचायत कार्यालयामध्ये उपसरपंच पदासाठी निवडणूक घेण्यात आली. या वेळी रोहिणी बनकर व संतोष चव्हाण हे दोन अर्ज दाखल झाल्याने यावेळी मतदान घेण्यात आले. पांढरेवाडी ग्रामपंचायत मध्ये अकरा सदस्य व बारावे जनतेतून निवडून आलेले सरपंच असा बारा जणांची ग्रामपंचायत पदाधिकारी असून यामध्ये संतोष चव्हाण यांना पाच तर रोहिणी बनकर यांना सहा मत पडल्याने यावेळी सरपंच छाया झगडे यांनी रोहिणी बनकर यांची उपसरपंचपदी निवड झाल्याचे घोषित केले. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून ग्रामसेवक संजय यादव यांनी पाहिले तर निवडणूक अध्यक्ष म्हणून सरपंच छाया झगडे यांनी केले. यावेळी पांढरेवाडी ग्रामस्थांनी नव्वर्चित उपसरपंच रोहिणी बनकर यांचे अभिनंदन केले.
आणखीन काही महत्त्वाचे
दौंड तालुक्यातील कुरकुंभ बारामती रस्त्यावर जिरेगाव हद्दीत एका तरुणाचा खून..
दौंड:-आलिम सय्यद दौंड तालुक्यातील पारगाव येथील निर्घृण हत्याकांड झाल्याची घटना ताजी असतानाच आज कुरकुंभ- बारामती महामार्गावरील जिरेगाव गावच्या हद्दीत एका...
आनंदी जीवन फाउंडेशनच्या वतीने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार तर १२० विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचे वाटप..
दौंड:- आलिम सय्यद, दौड तालुक्याच्या पश्चिम भागातील जावजीबुवाची वाडी येथील प्राथमिक शाळेतील इयत्ता १ ली ते इयत्ता ७ वी मधील...
राज्य शासनाकडून विश्वा लॅब कंपनीला उत्कृष्ट लघुउद्योजक पुरस्कार..
दौंड :- आलिम सय्यद पुणे जिल्ह्याच्या दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहत मधील विश्वा लॅबोरेटरीज प्रा. लि. या औषध निर्मिती कंपनीला...
जव्हार मर्चंट नागरी सहकारी (पतसंस्था) .बँक निवडणुकीची मतदार सभासदांची यादी जाहीर…
जव्हारचे राजे श्रीमंत यशवंतराव मुकणे महाराजांनी स्थापन केलेली जव्हार अर्बन बँक . आज या बँकेला १०० वर्षे पूर्ण होऊन गेले...
पौष्टिक तृणधान्य आहारात गरजेचे – राहुल माने..
दौंड:- आलिम सय्यद, दौंड तालुक्यातील पांढरेवाडी येथे आंतरराष्ट्रीय पौष्टिक तृणधान्य वर्ष 2022-23 निमित्त पौष्टिक तृणधान्य लागवड व त्याचे आहारातील महत्व...
धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मरणार्थ कुरकुंभ येथे क्रिकेट चे स्पर्धाचे आयोजन..
दौंड:- आलिम सय्यद, दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या स्मरणार्थ छत्रपती करंडक 2023 कुरकुंभ क्रिकेट चे स्पर्धा...