भाजपा पुणे जिल्हा अल्पसंख्याक उपाध्यक्षाचे मतदार यादीतून नाव उडवण्याचा खोडसाळपणा उघड..

दौंड:- आलिम सय्यद

दौंड तालुक्यातील मळद गावातील भाजपा अल्पसंख्यांक सेलच्या पुणे जिल्हा उपाध्यक्ष अँड अझरुद्दीन मुलाणी यांचं नाव मतदार यादीतून मळद गावातील कुल गटाच्या एका व्यक्तीने कुल गटाचेच असणारे अँड. मुलाणी यांचे नाव उडवण्याचा खोडसाळ प्रकार केला केला असून यावेळी मुलाणी यांना याबाबतचे दौंड तहसील यांच्याकडून नोटीस आल्याने हा प्रकार उघड झाला आल्याचं यावेळी मुलाणी यांनी सांगितलं.असं जर एका वकीलाबरोबर होत असेल तर सामान्य माणसंच काय अजून किती नावे दौंड तालुक्यातील मतदार यादीतून कमी करण्याचा प्रकार कुणाबरोबर घडला आहे का. त्यामुळे सर्वांनी आपली नावे मतदार यादीत आहेत का हे तपासण्याची गरज आहे .
असा खोडसाळ प्रकार करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्याची मांगणी यावेळी भाजपा अल्पसंख्याक पुणे जिल्हा उपाध्यक्ष अँड अझरुद्दीन मुलाणी यांनी केली

अँड. अझरुद्दीन मुलाणी
मी मळद गावचा कायमचा रहिवाशी असून मी माझ्या गावात अनेक वेळा मतदानाचा हक्क बजावला आहे. तरी गावातीलच व्यक्तीकडून अश्या खोडसाळ पणा करून मतदार यादीतून माझ नाव कमी करू शकतात पण जनतेच्या मनातून कमी करू शकत नाहीत असे मुलाणी म्हणाले

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!