आपण या बँकेचे ग्राहक असाल तर,१० हजारांपेक्षा जास्त पैसे काढता येणार नाहीत..

मुंबई-  वाईट आर्थिक स्थितीनंतर रिझर्व्ह बँकेने आणखी एका बँकेवर निर्बंध लादले आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) राज्यातील नगर अर्बन को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड, अहमदगरवर अनेक निर्बंध लादले आहेत.

या निर्बंधांनुसार, बँकेच्या ग्राहकांसाठी त्यांच्या खात्यातून पैसे काढण्याची मर्यादा 10,000 रुपये निश्चित करण्यात आली आहे. ( Reserve Bank of India has imposed several restrictions on Nagar Urban Co-operative Bank Limited, Ahmednagar, Maharashtra.)

बँकेची आर्थिक स्थिती बिकट आहे

बँकेची ढासळलेली आर्थिक स्थिती पाहता मध्यवर्ती बँकेने हे पाऊल उचलले आहे. बँकिंग नियमन कायदा (सहकारी संस्थांना लागू), 1949 अंतर्गत हे निर्बंध 6 डिसेंबर 2021 रोजी कामकाजाची वेळ संपल्यापासून सहा महिन्यांच्या कालावधीसाठी लागू असतील आणि त्यांचे पुनरावलोकन केले जाईल.

मध्यवर्ती बँकेने म्हटले आहे की, बँक त्यांच्या परवानगीशिवाय कोणतेही कर्ज किंवा अग्रिम देणार नाही किंवा कर्जाचे नूतनीकरण करणार नाही. यासोबतच, बँकेकडून कोणत्याही प्रकारची गुंतवणूक, कोणत्याही प्रकारचे दायित्व घेणे, पेमेंट करणे आणि मालमत्तेचे हस्तांतरण किंवा विक्री करणे देखील प्रतिबंधित असेल.

10 हजारांपेक्षा जास्त पैसे काढता येणार नाहीत

रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, बँकेचे ग्राहक त्यांच्या बचत बँक किंवा चालू खात्यातून 10 हजार रुपयांपेक्षा जास्त काढू शकणार नाहीत. रिझर्व्ह बँकेच्या आदेशाची प्रत बँकेच्या आवारात लावण्यात आली आहे, जेणेकरून ग्राहकांना त्याची माहिती मिळू शकेल.

मात्र, हे निर्बंध बँकिंग परवाने रद्द करण्याचा अर्थ घेऊ नये, असे मध्यवर्ती बँकेने स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!