
नेवासा घरी राहूनच ईदची नमाज अदा करण्याचा झाला निर्णय
ईदच्या पार्श्वभूमीवर पोलीस प्रशासनाच्या वतीने मुस्लिम समाज बांधवांची बैठक
घरी राहूनच ईदची नमाज अदा करण्याचा झाला निर्णय
नेवासा(प्रतिनिधी)
रमजान ईद सणाच्या पार्श्वभूमीवर नेवासा पोलीस स्टेशन प्रांगणात रविवारी दि.९ मे रोजी मुस्लिम समाज बांधवांची बैठक घेण्यात आली.कोरोना महामारीचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता यावर्षी सर्व मुस्लीम बांधवांनी ईदच्या दिवशी घरी राहूनच ईदची नमा अदा करण्याचा निर्णय सर्वानुमते घेतला.
नेवासा पोलीस स्टेशनच्या प्रांगणात झालेल्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी प्रांताधिकारी गणेश पवार हे होते तर तहसीलदार रुपेशकुमार सुराणा पोलीस निरीक्षक
विजय करे यावेळी उपस्थित होते. यावेळी पोलीस निरीक्षक विजय करे यांनी उपस्थित मुस्लीम बांधवांना
ईदच्या शुभेच्छा देत यावर्षी ही कोरोनाचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने सर्व समाज बांधवांच्या हिताच्या दृष्टीने घरात बसूनच ईदची नमाज अदा करावी
कोणीही कब्रस्थान व ईदगाह मैदानावर जाण्याचा प्रयत्न करू नये अशी विनंतीसह आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले.
यावेळी झालेल्या बैठकीत मुस्लीम समाजाचे जेष्ठ कार्यकर्ते गफुरभाई बागवान,रहेमानभाई पिंजारी, जुम्माखान पठाण,आसिफभाई पठाण,ईम्रानभाई दारूवाले यांनी काही महत्वपूर्ण सूचना केल्या तसेच ईद सणाच्या निमित्ताने किराणा खरेदीसाठी तसेच लहान मुलांना कपडे घेण्यासाठी रेडिमेडची दुकाने उघडी करावीत अशी मागणी करण्यात आली.
प्रांताधिकारी गणेश पवार म्हणाले ईदच्या सणाच्या निमित्ताने वरिष्ठ पातळीवर कोणतीही दुकाने न उघडण्याचा निर्णय झाला नसल्याने जिल्हाधिकारी यांच्या आदेशानुसार कोणतीही मागणी मान्य करता येत नाही असे सांगितले.तहसीलदार रुपेशकुमार सुराणा यांनी कोरोनाची महामारी लक्षात घेता सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करण्याची भूमिका घ्यावी असे आवाहन केले.
यावेळी बोलताना पोलीस निरीक्षक विजय करे म्हणाले की यावर्षी कोरोनाचा मोठ्या प्रमाणात असलेला प्रादुर्भाव लक्षात घेता जागण्याच्या रात्री कोणीही कब्रस्थानकडे जाण्याचा प्रयत्न करू नये,ईदच्या दिवशी घरीच नमाज अदा करून ईदचा सण समाज बांधवांनी साजरा करावा,शासनाच्या नियमांचे सर्वांनी पालन करावे आपल्याकडून शासन नियमांचे उल्लंघन होणार नाही याची सर्वांनी खबरदारी घ्यावी असे आवाहन केले.
यावेळी सहायक पोलीस निरीक्षक विजय ठाकूर,उपनिरीक्षक भरत दाते,उपनिरीक्षक भाटेवाल, गोपनीय शाखेचे प्रमुख प्रशांत भराट,जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते खुदाबख्श शेख, मौलाना तनवीर,मौलाना इम्रान,हाफिज अरमान,सुलेमान मणियार ,जब्बार शेख ,यांच्यासह मुस्लीम समाज बांधव उपस्थित होते