इतरणीस फाईन केमिकल कंपनीने दौंड तहसील यांच्याकडे दिले दोन ऑक्सिजन तयार होणारे यंत्र

प्रतिनिधी :-आलिम सय्यद, दौंड-पुणे

राज्याबरोबरच दौंड तालुक्यात कोरोना संकटामुळे अत्यंत बिकट परिस्तिथी निर्माण झाली आहे . अनेक रुग्ण ऑक्सिजन च्या तुटवड्याने तसेच ऑक्सिजन बेड उपलब्ध होत नसल्याने नाराज आहेत. या पार्श्वभूमीवर कुरकुंभ औद्योगिक वसाहत मधील इटरणीस फाईन केमिकल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीने सामाजिक बांधिलकी म्हणून रुग्णांना ऑक्सिजन मिळावा या हेतूने दौंड तहसीलदार यांच्याकडे दोन ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मशिन्स देण्यात आल्या आहेत. या एका मशीन द्वारे दोन रुग्णांना ऑक्सिजन मिळू शकतो तसेच या मशीनला ऑक्सिजन तसेच लिक्विड ची गरज नसून सदर ची मशीन इलेक्ट्रिक वर ऑक्सिजन तयार करत असल्याचे कंपनीचे मॅनेजर विजय खाडे यांनी माहिती दिली.

ऑक्सिजन च्या कमतरतेमुळे रुग्णांची तडफड होत असून शहर आणी ग्रामीण भागातून ऑक्सिजन मिळविण्यासाठी रुग्णांच्या नातेवाईकांची पळापळ होत असते या हेतूने ऑक्सिजन तयार होणारी दोन यंत्र कंपनीच्या माध्यमातून देण्यात आली आहे.
यावेळी कंपनीचे मॅनेजर विजय खाडे, महेश दहातोंडे,भीमराव नाईकर , उपस्थित होते.
इटरणीस फाईन कंपनीने हे यंत्र दौंड तालुक्यातील रुग्णांना उपलब्ध करून दिल्याने तहसीलदार संजय पाटील यांनी कंपनीचे आभार मानले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!