
प्रदूषणाबाबत शेतकऱ्यांचे चौथ्या दिवशी आमरण उपोषणाला स्थगिती..
दौंड :- आलिम सय्यद,
गेल्या चार दिवसांपासून पांढरेवाडी गावातील कुलंगे कुटूंबाचं दौंड तहसील कार्यलयासमोर आमरण उपोषण चालू होतं कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील रोजच्या होणाऱ्या प्रदूषणावरती उपोषण सुरू होत. मात्र चौथ्या दिवशी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांना उशिरा जाग येऊन त्यांनी आज सायंकाळी उपोषण कर्त्यांना भेट दिली असता याबाबत लेखी आश्वासन दिल्यानंतर चौथ्या दिवशी हे आमरण उपोषण स्थगिती करण्यात आलं.अनेक वर्षांपासून कुरकुंभ औद्योगिक वसाहत मधील अनेक कंपन्या कंपन्यांमधून निघणारे दूषित रासायनिक सांडपाणी उघड्यावर सोडले जाते हेच दूषित रासायनिक सांडपाणी थेट पीडित शेतकऱ्यांच्या शेतात जात असल्याने या होणाऱ्या नुकसानीची भरपाई या शेतकऱ्यांना मिळावी यासाठी येथील शेतकऱ्यांनी आमरण उपोषण केले होते. यावेळी शेतातील मातीचे नमुने, व पाण्याचे नामुन्याचा अहवाल आल्यानंतर संबंधित अहवाल जिल्हाधिकारी यांना देऊन पुढील कारवाही होईल असं यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांनी लेखी आश्वासन दिले. यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे प्रादेशिक अधिकारी नितीन शिंदे. उपप्रादेशिक अधिकारी प्रताप जगताप, तहसीलदार संजय पाटील, पोलीस निरीक्षक नारायण पवार, यांनी यावेळी उपोषण कर्त्यांना लिंबू शरबत पाजून उपोषण सोडण्यात आले. यावेळी प्रदूषण नियंत्रण मंडळाचे सुर्यकांत शिंदे , एमआयडीसी अधिकारी विजय पेटकर, प्रशांत जोशी, नरसिंग थोरात उपस्थित होते
आणखीन काही महत्त्वाचे
शेवगाव शहरातील टपरी धारकांचे तत्काळ पुनर्वसन करा कॉ. संजय नांगरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या उपोषणाचा दुसरा दिवस
शेवगाव प्रतिनिधी सविस्तर वृत्त असे की शहरातील प्रमुख राज्य महामार्गावरील अतिक्रमण हटाव मोहिमेत विस्थपित झालेल्या व्यापाऱ्यांचे प्रशासनाने तातडीने पुनर्वसन करावे...
चाइल्ड करीअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज चा नवरंग कला महोत्सव 2025
चाईल्ड करिअर इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनिअर कॉलेजचे वार्षिक स्नेहसंमेलन ठरले लक्षवेधी. नेवासा तालुक्यातील सलाबतपुर येथील गुणवत्ता संस्कार संस्कृती व...
शेवगांव तालुक्यात राजरोस अफुची शेती अफुच्या झाडाची बेकायदेशिर रित्या लागवड..
शेवगांव तालुक्यात राजरोस अफुची शेती अफुच्या झाडाची बेकायदेशिर रित्या लागवड करणा-या आरोपीस साडेअकरा लाख किंमतीच्या मुद्देमालासह गणेश नवनाथ घोरतळे या...
मढी ग्रामपंचायत सदस्यांची सदस्यता रद्द करण्याची एमआयएमची मागणी
लोकप्रतिनिधी कायदया अंतर्गत सदस्यता रद्द करा - डॉ परवेज अशरफी नगर - सध्या महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशात तसेच ज्या...
तालुकाध्यक्षपदी अशोकराव मोरे यांची निवड..
नेवासे शहर ता.04 अंमळनेर येथील सामजिक कार्यकर्ते अशोकराव मोरे यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष (अजित दादा गटाच्या) नेवासे तालुकाअध्यक्षपदी निवड करण्यात...
चाइल्ड करिअर इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरुौर्णिमा उत्साहात साजरी..
चाइल्ड करिअर इंग्लिश मिडीयम स्कूल अँड ज्युनियर कॉलेज मध्ये गुरुौर्णिमा उत्साहात साजरी नेवसा तालुक्यातील सलाबतपुर येथील चाईल्ड करिअर इंग्लिश मिडीयम...