खुले ड्रेनेज लवकरात लवकर झाकण्यासाठीचे निवेदन सादर…

देवदत्त उघडे
उल्हासनगर प्रतिनिधी
सार्वजनिक बांधकाम विभाग उल्हासनगर महानगर पालिका यांच्या वतीने प्रभाग समिती ४ अंतर्गत असलेल्या पॅनल १८ मधील नालंदा शाळे जवळच असलेल्या लिंबोनी वण सोसायटी मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने एक महिन्या अगोदर पक्क्या नाल्यांचे बांधकाम करण्यात आले जवळपास सर्वच ठिकाणी नाली झाकण्यात आली आहे परंतु काही ठिकाणी ड्रेनेज सारखे गॅप ठेवण्यात आले आहेत व
त्यावर झाकण लावण्याचे काम अद्याप ही केले नाही अशाच प्रकारे बांधकाम केलेली नाली ही ५ ते ६ ठिकाणीं ड्रेनेज गॅप सारखी उघडी आहे , अशा ड्रेनेज गॅप वर सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने अद्याप ही झाकण न लावण्याने रात्री च्या वेळेस लहान मुलं व वयोवृद्ध नागरिक याना प्रचंड भिती वाटत आहे, काही ड्रेनेज गॅप मध्ये तर लहान मुले पडल्याच्या घटना सुद्धा घडल्या आहेत. या करीता सामजिक कार्यकर्ते ॲड. प्रशांत चंदनशिव यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग उल्हासनगर महानगरपालिका याना निवेदन देऊन कळविले आहे व लवकरात लवकर यावर काही उपाय योजना करावी अशी विनंती केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!