
शंभर किलोमीटर सायकलिंग करून ऑपरेशन विजय मधील सहभागी शूर जवानांना अभिवादन
*राजु तडवी फैजपुर*
दिनांक 26 जुलै हा दिवस संपूर्ण देशात कारगिल विजय दिवस म्हणून साजरा होत असताना 18 महाराष्ट्र बटालियन चे समादेशक अधिकारी कर्नल प्रवीण धीमन, सुभेदार मेजर कोमलसिंग, सुभेदार अजित सिंग, सुभेदार जयपाल सिंग यांच्यासोबत लेफ्टनंट योगेश बोरसे व जळगाव येथील मूळजी जेठा महाविद्यालयाच्या 21 कडेटसने 100 किलोमीटर सायकलिंग करून कारगिल युद्धात सहभागी जवानांना आगळ्या वेगळ्या पद्धतीने अभिवादन केले.
भारतीय इतिहासात दिनांक 4 जुलै ते 26 जुलै 1999 या 60 दिवसाच्या अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत पाकिस्तानी घुसपैठियावर अत्यंत अभिमानास्पद विजय संपादन करून भारतीय सैन्याने संपूर्ण विश्वात सामर्थ्याचा डंका वाजवला होता. त्या विजयाची आठवण म्हणून संपूर्ण देशात या दिवशी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून 18 महाराष्ट्र बटालियन एनसीसी जळगाव चे समादेशक अधिकारी कर्नल प्रवीण धीमन यांच्या नेतृत्वाखाली जळगाव येथील बटालियन चे अधिकारी व कॅडेटस यांनी जळगाव ते फैजपुर असा 100 किलोमीटर सायकलींगचा प्रवास करून कारगिल विजय दिवस अत्यंत उत्साहात साजरा केला. यावेळी त्यांनी फैजपूर येथील 1936 च्या राष्ट्रीय काँग्रेस प्रथम ग्रामीण अधिवेशनाच्या भूमीवर धनाजी नाना महाविद्यालयाला भेट दिली. यावेळी उपस्थित कॅडेट्स यांना कर्नल प्रवीण धीमन यांनी स्वतः कारगिल युद्धात सामील असलेल्या स्वानुभव कथन केले. व देश सेवेसाठी सदैव सज्ज राहण्याचे आवाहन केले. याप्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर पी आर चौधरी यांनी सायकलिंग करणाऱ्या टीमचे स्वागत करीत कारगिल विजय दिवसाच्या औचित्याने महाविद्यालयात आल्याबद्दल आभार व्यक्त केले. यानिमित्ताने प्रत्येकाने भारतीय सैन्याचा आदर्श घेऊन आपापल्या परीने देशसेवा करावी असे आवाहन केले. यावेळी लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत, लेफ्टनंट योगेश बोरसे, सुभेदार मेजर कोमलसिंग, सुभेदार अजित सिंग, सुभेदार जयपालसिंग आदी मान्यवर उपस्थित होते.
कारगिल विजय दिवसाच्या औचित्याने महाविद्यालयाच्या परिसरात मान्यवरांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. यावेळी अशराज गाढे, मंदार बामनोदकर, गणेश चव्हाण, वेदांत राजपूत, मोहन कोळी, यशकुमार वारुळे यांनी कारगिल विजय दिवसानीमत्ताने मनोगते व्यक्त केली व उपस्थित कॅडेटस यांनी देश सेवेसाठी समर्पित होण्याची करण्याची शपथ घेतली. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी लेफ्टनंट डॉ राजेंद्र राजपूत, शेखर महाजन सुधीर पाटील, अजय पाटील, उदय अढळकर, अशपाक शेख, अजय चौधरी, आकाश कोळी, शेखर भालेराव, शैलेश भालेराव, ईंश्वर चौधरी, यांनी परिश्रम घेतले.