
बारामती तालुक्यात खून केलेला फरार आरोपी कुरकुंभ पोलिसांनी केला गजाआड : कुरकुंभ पोलिसांची कामगिरी कौतुकास्पद
दौंड :- आलिम सय्यद
बारामती तालुक्यातील सोनवडी सुपे येथे जुन्या भांडणाच्या कारणावरून खून झाला होता यामध्ये दीपक आनंदराव सोनवणे रा उंडवडी सुपे. ( ता बारामती ) यांना जबर मारहाण केल्याने यांच्यावर पुणे येथे उपचार सुरू असताना ते मयत झाले याबाबत मनीषा दीपक सोनवणे यांनी नयूम गनीम सय्यद रा. मतेमळा , सोनवडी. उंडवडी ता. बारामती याच्यावर २० जुलै रोजी वडगाव निंबाळकर पोलीस स्टेशन येथे भा. द. वि. ३०२. अनुसूचित जाती जमाती अत्याचार प्रतिबंधक अधिनियम नुसार गुन्हा दाखल केला होता. यामध्ये आरोपीने सदर इसमास जुन्या भांडणाच्या कारणावरून नयूम सय्यद याने दीपक सोनवणे यांच्या डोक्यात तसेच अंगावर जबर मारहाण केल्याने त्यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला होता याबाबत मनीषा सोनवणे यांनी नयूम सय्यद याच्या विरोधात फिर्याद दिली होती. सदर आरोपी गुन्हा घडल्या पासून फरार असताना आरोपी इसम नामे नयूम सय्यद हा दौंड पोलीस स्टेशन च्या हद्दीत कुरकुंभ येथे ता. २६ जुलै रोजी पाहटे कुरकुंभ पोलीस गस्त घालत असताना सदर पोलिसांना त्या व्यक्तीचा संशय आल्याने त्यास विचारपूस केली असता तो उडवा उडवीची उत्तरे दिली असता त्याची कुरकुंभ पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने बारामती तालुक्यातील सोनवडी येथील दीपक सोनवणे यांचा खून करून फरार असल्याचं पोलिसांना सांगितले यावेळी कुरकुंभ पोलिसांनी पुढील तपासकामी त्यास वडगाव निंबाळकर पोलिसांच्या ताब्यात दिले. असल्याची माहिती कुरकुंभ पोलीस हवालदार श्रीरंग शिंदे यांनी सांगितले.
सदरची कामगिरी अप्पर पोलीस अधीक्षक मिलिंद मोहिते, उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस , पोलीस निरीक्षक नारायण पवार, पोलीस उपनिरीक्षक सुशील लोंढे, यांच्या मार्गदर्शनाखाली कुरकुंभ पोलीस हवालदार श्रीरंग शिंदे, पोलीस नाईक राकेश फाळके, महेश पवार, दत्तात्रेय चांदणे, अमोल राऊत, होमगार्ड अक्षय कांबळे यांनी गस्त घालताना कामगिरी केली