
साई एकविरा प्रतिष्ठान तर्फे गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप..
प्रतिनिधी :- निलम ढोले कर्जत
कर्जत तालुक्यातील ज्या गावात जाण्यासाठी सुमारे साडे चार किलोमीटर लांबीचा मातीचा कच्चा रस्ता आहे, शाळेची शासकीय इमारत नाही अशा माथेरान च्या डोंगराळ परिसरातील अतिदुर्गम भागातील नाण्याचा माळ शाळेतील गरजू विद्यार्थ्यांना मदतीचा हात देण्यासाठी मागील वर्षीप्रमाणे यावर्षी देखील साई एकविरा प्रतिष्ठान ,ठाणे तर्फे मंडळातील अर्णव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त श्री चंद्रकांत म्हात्रे ,मंगेश भोईर, कमलेश साटम, उत्तम फुलोरे, रोशन केनी व प्रसाद कदम यांनी शालेय व विद्यार्थी उपयोगी साहित्य जसे की मोठा लाऊड स्पीकर व माइक सेट, वजन काटा ,मोठे घड्याळ अभ्यासाचे तक्ते, सर्व विद्यार्थ्यांना चपलांचे जोडे ,वह्या, रंगीत खडू ,चित्रकला वही, पट्टी, पेन, पेन्सिल ,खोडरबर, बिस्किट्स ,चॉकलेट्स इत्यादी साहित्याचं भरभरून वाटप केलं व विद्यार्थ्यां समवेत केक कापून ,गप्पा गोष्टी करत ,हसत खेळत अनोख्या पद्धतीने वाढदिवस साजरा केला.
रा जि प शाळा नाण्याचा माळ येथे इयत्ता पहिली ते चौथी चे एकूण 17 विद्यार्थी शिक्षण घेतात येथील शिक्षक श्री रुपेश मोरे व सतीश सोनवणे यांच्या विनंतीनुसार साई एकविरा प्रतिष्ठान मधील सर्व सदस्यांनी मिळून आज शनिवार दिनांक 18 डिसेंबर 2021 रोजी मंडळातील कार्यकर्ते अर्णव पाटील यांच्या वाढदिवसाच औचित्य साधून शाळेतील विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटपाचा कार्यक्रम पार पाडला.. कार्यक्रम प्रसंगी विद्यार्थी व पालकां समोर बोलताना मंडळातील सदस्यांनी यापुढे देखील विद्यार्थ्यांना आवश्यक ती मदत पुरविण्याच आश्वासन दिल.