कळंब ग्राम पंचायतची पुर्नगठित वन हक्क समितीची निवड

 

प्रतिनिधी कर्जत : संजय कदम

दि.२१ डिसेंबर २०२१ रोजी ग्रुप ग्राम पंचायत कळंब अंतर्गत येणाऱ्या तात्याचीवाडी महसुल गावा अंतर्गत येणाऱ्या चाहुचीवाडी, बोरीचीवाडी, खालची भागुचीवाडी, मिरचुलवाडी, वरची भागुचीवाडी, पादीरवाडी, बनाचीवाडी, सुतारपाडा अशा सातही वाडयांची एकत्रित ग्रामसभा चाहुचीवाडी येथे घेण्यात आली.या ग्रामसभेत कळंब हददीच्या सात आदिवासी वाडयातील १३० संख्येपेक्षा जास्त लोक उपस्थित होते. उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने २५० वैयक्तिक वन हक्कांचे दावे दाखल करण्याचे नियोजन करण्यात आले. त्यासाठी “वन हक्क समितीचे पुर्नगठन” करण्यात आले व तसा ठराव सर्वानुमते मंजूर करण्यात आला. या ग्रामसभेत वन हक्क समिती पुर्नगठणच्या ठरावाचे अभिवाचन मा.सरपंच सौ.रेवती लहू ढोले यांनी केले.त्यानंतर समिती पुर्नगठित करण्यात आली.कळंब ग्राम पंचायतमधील सातही वाडयातील आदिवासी लोक हे पिढयान पिढया कसत असलेली जमीन, जागा, वनाचा भाग हा काही अनेक वर्षापासून फॉरेस्ट विभागाच्या अंतर्गत येत आहे. त्या जमीनी, जागा, वनाच्या भागावर आदिवासी लोक आपला उदरनिर्वाह करून आपले कुटुंब चालवत आहेत. अशा जमिनीच्या, जागेच्या, वनाच्या हक्कासाठी कळंब परिसरातील सातही वाडयातील लोक फॉरेस्ट मधील जमिनी, जागा, वनाचा भाग मिळण्यासाठी प्रयत्नशील आहेत.
वन हक्क जमिनी बाबत लोकांना न्याय मिळवून देणारी वातावरण फाऊंडेशन संस्थेच्या कार्याची माहिती होताच कळंब ग्राम पंचायतच्या सदस्या सौ.निलम ढोले, प्रकाश निरगुडा, सौ.जानकी पारधी, मा.सरपंच सौ.रेवती ढोले यांनी वातावरण संस्थेचे पदाधिकारी उदयकुमार सर, अविनाश सर यांच्याशी संपर्क साधून त्यांना प्रत्यक्ष बोलवून सातही वाडयातील लोकांशी बोलून चर्चा करून, लोकांच्या सुचनेनुसार आज मंगळवार दि.२१/१२/२०२१ रोजी सात वाड्यांचे ग्रामस्थ, वातावरण संस्थेचे पदाधिकारी, फॉरेस्टरचे अधिकारी, ग्राम पंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत ग्रामसभेचे आयोजन करून उपस्थित १३० लोकांच्या उपस्थितीत कळंब ग्राम पंचायतची सर्वांनुमते वन हक्क समिती अध्यक्ष सौ.निर्मला गणेश निरगुडा, सचिव किसन पदू पादीर सदस्य बुधाजी ढोले, परशुराम निरगुडा, रेवती ढोले, काशिनाथ पुंजारा, बाबू ढोले, रमेश पारधी, काशिनाथ निरगुडा, मालु कांबडी, जोत्सना दोरे, ज्योती निरगुडा, कृष्णा बदे, राहुल चोणकर यांची निवड करून समिती पुर्नगठित करण्यात आली.
तसेच नवीन दाखल करावयाच्या वन हक्क दाव्यांच्या संदर्भात, प्रक्रियेबाबत माहिती देण्यात आली.
या वन हक्क समिती पुर्नगठित ग्रामसभेला फॉरेस्टर विभागाचे अधिकारी संदिप चव्हाण साहेब, संजय पाटील साहेब, बबन राठोड साहेब, वातावरण फांऊडेशनचे अधिकारी राहुल सर, उदयकुमार सर, अविनाश सर, वसंत ढोले सर,ग्राम पंचायत सदस्य प्रकाश निरगुडा, निलम ढोले, जानकी पारधी, मा.सरपंच रेवती ढोले, रामा पुंजारा, भरत दोरे, रवी पुंजारा, हरि ढोले, महेश निरगुडा, कृष्णा दोरे, सोमा शिद, काशिनाथ निरगुडा, कमळू ढोले आदि सह सातही वाड्यातील सर्व कुटुंबातील प्रत्येकी एक व्यक्ती उपस्थित होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!