धनाजी नाना महाविद्यालयात करियर कट्टा अंतर्गत ब्रँड अँबेसिडर ची निवड..

—————————————-
राजु तडवी फैजपुर

फैजपूर येथील तापी परिसर विद्या मंडळ संचलित धनाजी नाना महाविद्यालयात महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षण विभाग व महाराष्ट्र राज्य माहिती तंत्रज्ञान सहायता विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने करिअर कट्टा या नाविन्यपूर्ण उपक्रमांतर्गत महाविद्यालयातर्फे ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून जयमाला दीपक चौधरी (एम एस्सी द्वितीय वर्ष सूक्ष्मजीवशास्त्र विभाग) व रोहित माधव चौधरी (तृतीय वर्ष विज्ञान संगणक शास्त्र) या विद्यार्थ्यांची ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून निवड करण्यात आली.

करियर कट्टा या उपक्रमांतर्गत उद्योजक आपल्या भेटीला व आयएएस आपल्या भेटीला अशा नाविन्यपूर्ण उपक्रमाच्या माध्यमातून महाराष्ट्रातील तरुणांसाठी स्पर्धा परीक्षा क्षेत्राची संपूर्ण तयारी करण्याच्या उदात्त हेतूने महाविद्यालयाच्या करियर कट्टा एककाच्या वतीने अनेक उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे.

त्यात प्राचार्य डॉ पी आर चौधरी यांच्या उद्बोधन सभेत महाविद्यालयातील सर्व विद्यार्थ्यांना करियर कट्टा संबंधी विस्तृत माहिती देण्यात आली. यासोबत महाविद्यालयाचे करियर कट्टा समन्वयक डॉ एस व्ही जाधव यांनी वर्गा- वर्गावर जाऊन विद्यार्थ्यांना करियर कट्टा संबंधी सखोल माहिती दिली. या विद्यार्थ्यांनी दिवसाला एक रुपया याप्रमाणे वर्षभरातून 365 रुपये भरून करियर कट्ट्याचे सदस्यत्व प्राप्त केले व या माध्यमातून करिअरच्या विविध संधी शोधण्याचा प्रयत्न केला जात आहे. येत्या काही वर्षात करिअर कट्ट्याच्या माध्यमातून परिसरातील विद्यार्थ्यांना प्रशासकीय अधिकारीपदी निवड झालेली पाहतांना अत्यानंद होईल असा आशावाद डॉ एस व्ही जाधव यांनी यावेळी व्यक्त केला. या कामी तापी परिसर विद्या मंडळाचे अध्यक्ष मा श्री शिरिषदादा चौधरी, इतर सन्माननीय पदाधिकारी, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ पी आर चौधरी, सन्माननीय उपप्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी मार्गदर्शन व सहकार्य करीत आहेत. कै दामोदर नाना चौधरी क्षमता विकास प्रबोधनी व करियर कट्टा समिती समन्वयक डॉ एस व्ही जाधव, प्रा व्ही सी बोरोले, डॉ कल्पना पाटील, डॉ राजेंद्र राजपूत, डॉ सागर धनगर, डॉ योगेश तायडे, प्रा निखिल वायकोळे, डॉ सरला तडवी, प्रा शेरसिंग पाडवी, प्रा शुभांगी पाटील आदी परिश्रम घेत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!