निर्भीड पत्रकार संघाची गेवराई तालुक्याची कार्यकारणी जाहीर…..

तालुकाध्यक्षपदी अमोल कापसे तर शहराध्यक्षपदी हारून शेख यांची निवड….

गेवराई प्रतिनिधी -: दि. २७ निर्भीड पत्रकार संघ महाराष्ट्र राज्य या पत्रकार संघाची गेवराई तालुक्याची कार्यकारणी जाहीर झाली आहे. निर्भीड पत्रकार संघाच्या संस्थापक अध्यक्षा सौ. रुचिता मलबारी यांच्या आदेशानुसार तर प्रदेशाध्यक्ष शेख तय्यब यांच्या शिफारसीनुसार तर जिल्हाध्यक्ष देवेंद्र ढाका यांच्या मार्गदर्शनाखाली
ही निवड करण्यात आली. यावेळी गेवराई तालुका अध्यक्षपदी अमोल कापसे तर शहराध्यक्षपदी शेख हारून यांची निवड करण्यात आली. यावेळी विविध पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र व ओळखपत्र देण्यात आले. यावेळी तालुक्यातील पत्रकार बांधव उपस्थित होते.
यावेळी गेवराई तालुका अध्यक्षपदी अमोल कापसे, तालुका उपाध्यक्षपदी शेख सलमान, तालुका सचिव पदी विष्णू राठोड,तालुका कोषाध्यक्षपदी शेख अमीन, तालुका कार्याध्यक्षपदी बाळासाहेब घाडगे,तालुका संघटक पदी विशाल कापसे,तालुका सहसंघटक पदी अशोक मोरे,
तालुका प्रसिद्धी प्रमुख पदी समीर सौदागर,
तर शहराध्यक्षपदी शेख हारून,शहरउपाध्यक्षपदी शेख उस्मान, शहर सचिवपदी शेख सलीम ,तर कायदेशीर सल्लागार म्हणून ऍड.पवन लाहोटी,ऍड.गणेश कोल्हे यांची निवड करण्यात आली तर मार्गदर्शक म्हणून जेष्ठ पत्रकार राम रुकर, खदिर बागवान यांची निवड करण्यात आली. तर कार्यकारणी च्या सदस्यपदी भाऊसाहेब महानोर,असलम कादरी, शुभम घोडके,अंगद गावडे, सय्यद कौसर,जावेद शेख,सचिन डोंगरे, यांची निवड करण्यात आली. यावेळी तालुका अध्यक्ष अमोल कापसे आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी पत्रकार उपस्थित होते. यावेळी आभार प्रदर्शन शेख सलमान यांनी मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!