दुखापतग्रस्त कबड्डी पटटूला कबड्डी असोसिएशन कडून मदत

प्रतिनिधी :- कर्जत संजय कदम

कर्जत तालुक्यातील ग्रुप ग्राम पंचायत कळंब हददीतील भागुचीवाडी येथील विलास बबन निरगुडा(उर्फ काळू) हा कबड्डी पटटू टपालवाडी येथील कबड्डी सामन्या दरम्यान गंभीर दुखापत होऊन त्याच्या खांदयातील हाड निखळले होते. दुखापत ग्रस्त खेळाडूची घरची परिस्थिती बेताची असून वडिल, मोलमजुरी करून कुटुंब सांभाळत असताना घरच्या आर्थिक परिस्थितीमुळे दवाखान्यात उपचार करण्यास खेळाडू सह घरातील मंडळी टाळाटाळ करत असताना कबड्डी असोसिएशनचे पदाधिकारी अध्यक्ष मोहन वारघडे,उपाध्यक्ष भगवान भगत, पेण प्रकल्प अध्यक्ष दत्ता सुपे, जयराम उघडे, नितीन निरगुडा, वसंत ढोले सर,महेश निरगुडा इत्यादी मंडळी विलासच्या घरी जाऊन विलासचे ऑपरेशन करण्यास विनंती केली.विलासच्या ऑपरेशनसाठी कबड्डी असोशिएशन पदाधिकारी, कबड्डी संघ, खेळाडू, समाज संघटनांनी पुढाकार घेऊन तात्काळ एक मिटिंग लावून विलासच्या उपचारासाठी मदतीचे आव्हान केल्याने कबड्डी असो. पदाधिकारी, कबड्डी संघ,खेळाडू, समाज संघटनेचे पदाधिकारी, सह पंचायत समिती उपसभापती हिंदोळा ताई,पेण प्रकल्प अध्यक्ष सुपे साहेब, कबड्डी असोशिएशन अध्यक्ष मोहन वारघडे, स्थानिक कळंब ग्राम पंचायतचे सदस्य निलम ढोले,जानकी पारधी, अशा सारख्या समाज्याच्या अनेकांनी आपल्या खेळाडूच्या उपचारासाठी वैयक्तिक, सामुहिक एकूण ५४००० हजार रूपये जमा करून विलासच्या ऑपरेशनचा पूर्ण खर्च कर्जत तालुका कबड्डी असोशिएशन,कबडडी संघ, कबड्डी-क्रिकेट खेळाडू, समाज संघटनेचे पदाधिकारी, समाजातील दानशूरमंडळीनी उचलून विलासच्या उपचारासाठी सर्वच स्तरातून मदतीचा हात दिला आहे. विलास(काळू) निरगुडा दुखापतग्रस्त झाल्यापासून त्याच्या उपचारापर्यंत कबड्डी असोशिएशनच्या माध्यमातून असोशिएशनचे पदाधिकारी, कबड्डी संघ, खेळाडू, समाज संघटनांचे पदाधिकारी, समाजातील दानशुर मंडळींनी मदतीचा हात पुढे केल्याने समाजाने माणुसकीचे दर्शन घडवून विलासवर यशस्वी शस्त्रक्रिया करणे शक्य झाले- मोहन वारघडे(अध्यक्ष कर्जत कबड्डी असो.) विलास च्या उपचारासाठी जमा झालेली मदतीची रक्कम देताना कर्जत तालुका कबड्डी असोशिएशनचे अध्यक्ष मोहन वारघडे सर, उपाध्यक्ष भगवान भगत, खजिनदार जयराम उघडा, नेरळ ग्राम पंचायत सदस्य नितीन निरगुडा, वसंत ढोले सर, सहसचिव महेश निरगुडा, राजेंद्र निरगुडा, अरुण आवटे, भागुचीवाडी ग्रामस्थ उपस्थित होते. मदतीमुळे सर्व स्तरातून कर्जत कबडडी असोशिएनचे कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!