
शिवप्रसाद कांबळे दलित पँथर आगरवाडी शाखेच्या वतीने क्रांतिजोती सावित्रीमाई फुले जयंती साजरी…
डहाणू प्रतिनिधी
मौजे आगरवाडी सफाळे येथे दलित पँथर आगरवाडी शाखेच्या वतीने क्रांतीजोती सावित्रीमाई फुले जयंती साजरी करण्यात आली. सदर कार्यक्रमात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना पँथरचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष अविश राऊत यांच्या वतीने क्रांतिजोती सावित्रीमाई फुलेंच्या संपूर्ण जीवनपट , स्त्री शिक्षण आणि सामाजिक संघर्ष , सामाजिक परिवर्तन तसेच त्यांच्या प्रचंड कार्याला उजाळा देण्यात आला. जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते भिकाजी कुर्ले ,पालघर जिल्हा महासचिव व जिल्हा प्रसिद्धी प्रमुख संतोष कांबळे , पालघर जिल्हा महिला महासचिव सुमती कांबळे , पालघर जिल्हा युवाउपाध्यक्ष हितेश कुर्ले यांनी क्रांतिसूर्य महात्मा जोतिबा फुले आणि क्रांतिजोती सावित्रीमाई फुले या फुले दांपत्यांनी स्त्री शिक्षणासाठी केलेले संघर्ष तसेच स्त्री शिक्षणाचा पाया रचणाऱ्या भारताच्या पहिल्या महान महिला शिक्षिका क्रांतीजोती सावित्रीमाई फुले यांच्या संघर्षमय जीवनाची व कार्याची आठवण उपस्थित कार्यकर्त्यांना करून दिली. कार्यक्रमाची व्यवस्था प्रज्ञासूर्य मंडळ आगरवाडी यांनी केली होती. यावेळी पालघर जिल्हा उपाध्यक्ष रोहित चौधरी , पालघर जिल्हा महिला उपाध्यक्ष विद्याताई मोरे , पालघर जिल्हा महिला कार्याध्यक्ष मरिना रिबेलो , पालघर जिल्हा प्रमुख सल्लागार दिवाकर जाधव , पालघर तालुका महिला सहसचिव शमिका कुर्ले , पालघर तालुका सहसचिव योगेश राऊत , बोईसर शहर अध्यक्ष सिद्धार्थ वाघमारे तसेच कार्यकर्ते उपस्थित होते .
आणखीन काही महत्त्वाचे
मलकापूर येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जयंती उत्साहात साजरी..
सायंदैनिक अहिल्याराज च्या वर्धापन विशेष आवृत्तीचे विमोचन पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सायंदैनिक अहिल्याराज परिवार, व पत्रकार बांधवांच्या वतीने कृषी...
राज्यातील सर्व सामाजिक संस्था व वाचनालये संगणकीकृत करणार-दिपक आगळे पाटील.
संस्थापक अध्यक्ष. महाराष्ट्र राज्य एनजीओ फेडरेशन. अहमदनगर. महाराष्ट्र राज्यातील सामाजिक संस्थाची व सार्वजनिक वाचनालयाची परिस्थिती सद्या खूप बिकट आहे.राज्यात सुमारे...
पत्रकाराशी असभ्य वर्तन करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई करा.- हिंदी मराठी पत्रकार संघाचे निवेदन
पत्रकाराशी असभ्य वर्तन करणाऱ्या पोलीस उपनिरीक्षकावर कारवाई करा.- हिंदी मराठी पत्रकार संघाचे निवेदन कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकांच्या अनुषंगाने वृत्तसंकलन...
मुसळधार पावसाने प्रवरा नदीच्या पुलावरच पाणी तुंबले, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कारभाराबद्दल त्रिव संताप..
मुसळधार पावसाने प्रवरा नदीच्या पुलावरच पाणी तुंबले, सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कारभाराबद्दल त्रिव संताप नेवासा(प्रतिनिधी)शुक्रवारी दि.२८ एप्रिल रोजी झालेल्या पावसाने सर्वत्र...
भारतरत्न डॉक्टर बी आर आंबेडकर 132 वी जयंती सर्वपक्षीय उत्सव समिती पूर्व मतदार संघ गारखेडा परिसर गजानन महाराज मंदिर चौक येथे मोठ्या उत्साहात साजरी
भारतरत्न डॉक्टर बी आर आंबेडकर 132 वी जयंती सर्वपक्षीय उत्सव समिती पूर्व मतदार संघ गारखेडा परिसर गजानन महाराज मंदिर चौक...
अशोक कुटेंच्या वाढदिवसानिमित्त विविध जिल्ह्यात सर्व जातीय मोफत वधू-वर मेळाव्याचे आयोजन..
अहमदनगर प्रतिनिधी.. दि.13 एप्रिल । जगदंब फाउंडेशनचे सचिव व मराठी सोयरीक संस्थेचे अध्यक्ष अशोक पांडुरंग कुटे यांच्या वाढदिवसानिमित्त विविध जिल्ह्यांमध्ये...