अँड मुलाणी यांचा भाजपा पुणे जिल्हा अल्पसंख्यांक मोर्चा उपाध्यक्ष पदाचा तडका फडकी राजीनामा..

दौंड:- आलिम सय्यद,

भाजपा पुणे जिल्हा अल्पसंख्यांक मोर्चा उपाध्यक्ष अँड अझहरुद्दीन मुलाणी यांनी उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असून मुलाणी यांनी
अल्पसंख्याक मोर्चा उपाध्यक्ष पद म्हणून जबाबदारी सांभाळत होते . उपाध्यक्ष पदाची जबाबदारी देऊन मला माझ्या कार्य काळात सहकार्य करणारे जिल्हा अध्यक्ष राजू शेख यांचा आभारी असल्याचं यावेळी मुलाणी यांनी बोलताना सांगितले. मुलाणी यांनी समाज माध्यमांवर ( सोशल मीडिया) वर पोस्ट टाकून तडका फडकी राजीनामा दिल्याची माहिती दिल्याने दौंड तालुक्यात उलट सुलट चर्चेला उधाण आले आहे
मुलाणी हे भाजप चे दौंड चे विद्यमान आमदार राहुल कुल यांचे अतिशय निकटवर्तीय मानले जातात मुलाणी हे वकील असल्याने पुणे जिल्ह्यात तसेच दौंड तालुक्यात सामाजिक कामातून शेकडो लोकांच्या संपर्कात असतात मुलाणी यांनी अल्पसंख्याक मोर्चाचे काम जिल्हाभर वाढवले होते. त्यांच्या राजीनाम्याने त्यांचे समर्थक समाज माध्यमावर हळहळ व्यक्त करत आहेत

सदर राजीनाम्या विषयी मी समाजमाध्यमावर ( सोशल मीडिया ) वर माहिती दिली असून माझ्या वैयक्तिक कारणाने मी अल्पसंख्याक जिल्हा उपाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला असला तरी मी आमदार राहुल दादा कुल यांच्या सोबतच सामाजिक काम करणार आहे.

*अँड अजहरुद्दीन मुलाणी*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!