
फैजपुर शहारातुन जाणाऱ्या अंकलेश्वर-बुऱ्हाणपूर महामार्गाला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महामार्ग असा नामोल्लेख करावा. भिमपुत्र ग्रुपचे अध्यक्ष. पप्पु मेढे यांची मागणी..
राजु तडवी फैजपुर
फैजपुर शहरातील गुणवान, शीलवान, बुद्धीमान व सर्वगुण संपन्न असणारे माझे प्रिय पत्रकार बंधु, नागरिक, तसेच लोकप्रतिनिधी, व शासन, प्रशासनास. मी सांगु इच्छितो की फैजपुर नगरपालिकेने सन २०१२ मध्ये सर्व साधारण सभे मध्ये तत्कालीन नगराध्यक्षा मा.सौ. अमिता हेमराज चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली व तत्कालीन मुख्याधिकारी मा.श्री.अनिल मधुकर वायकोळे यांच्या उपस्थितीत, अंकलेश्वर – बुऱ्हाणपूर महामार्गा वरील फैजपुर शहरातील सुभाष चौक ते बसस्थानक मार्गाला, स्वतंत्र भारताचे भाग्यविधाते, भारतीय घटनेचे शिल्पकार, विश्वरत्न, परम पुज्य, बोधिसत्व, भारतरत्न. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देऊन सर्वानुमते ठराव पारीत करण्यात आला होता, तसेच नगरपालिके तर्फे त्या मार्गाच्या नामांतराचा फलक पूर्वीचे छत्री चौक व आताचे स्व बापु वाणी चौकात लावण्यात आलेला आहे तरी सुद्धा प्रत्येक वेळी त्या मार्गाला सुभाष चौक ते बसस्थानक असे वारंवार संभोधले जाते त्या मार्गाचे नामांतर करून सुद्धा फैजपुर शहरात व परिसरात या महामार्गाला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महामार्ग असा नामोल्लेख, लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासन व समस्त शहर वासीय करतांना दिसत नाही, या मुळे भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा अवमान होत असुन या पुढे सर्वांना आवाहन करतो की सर्वांनी सुभाष चौक ते बसस्थानक या मार्गाला भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर महामार्ग असेच संभोधले गेले पाहिजे असे मी सर्व लोकप्रतिनिधी, शासन, प्रशासन व सर्व नागरिकांना आवाहन करतो…