कचरा गाड़ीवर चालक असलेल्या वाजिद शेख यांनी दिला ईमानदारीचा परिचय !!

शेवगाव प्रतिनिधी युनूस शेख

कचऱ्यात लाख ते सव्वा लाखाचे सोने केले परत, सर्व समाजातून कौतुक व अभिनंदन!

अहमदनगर: अहमदनगर महानगर पालिकेच्या कचरा गाड़ीवर चालक असलेल्या घरची
परिस्थिति अत्यंत हलाखीची असलेल्या वाजिद शेख यांनी आज ही जगात ईमानदारी शिल्लक असल्याची प्रचिती दिली. दिनांक ०९/०१/२०२२ रोजी नेहमी प्रमाणे मुकुंदनगर या प्रभागात घरोघरीचा कचरा जमा करत होते दिवस भर कचरा जमा
करुन गाडीतील कचरा खाली करतांना त्यांना एक डबी निदर्शनास आली, ती डब्बी सहज
उघडली असता त्यामध्ये सोन्याचे
दागिने आढळून आले.वाजिद शेख यांनी गाडीवरील हेल्पर काळू शिन्दे यांचे बरोबर चर्चा करुन शोध घेतला असता सदर डबी डा.मोहम्मद आजम यांची असल्याची खात्री झाली.वाजीद शेख यांनी ती डबी ताबड़तोड़ डा.मोहम्मद आज़म यांना परत करुन आपल्यातील इमानदारीचा परिचय करून दिला.
हि घटना कळल्यानंतर महानगर पालिका आयुक्त व उपमहापौर श्री. गणेश भोसले यांनी वाजीद रफिक शेख यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार केला.
श्री. वाजिद शेख हे इन्सानियत फाऊंडेशन चे अध्यक्ष श्री इस्माईल भाई शेख यांचे भाचे असून इन्सानियत फाऊंडेशनच्या
वतीने कौतुक व सन्मान होत आहे. तसेच समाजातील सर्व स्थरातून वाजिद शेख यांचे कौतुक होत आहे. तसेच घटनेनंतर अनेकांनी महानगर पालिकेला विनंती केली की, वाजिद शेख यांना त्यांचे ईमानदारी करिता नौकरीत कायम करावे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!