दौंड तालुक्यातील जिरेगाव येथील एका क्रॅशर मध्ये एका कामगाराला सुरक्षा साधनाअभावी जीव गमवावा लागला…

दौंड:- आलिम सय्यद,

दौंड तालुक्यातील जिरेगाव येथील एका क्रॅशर मध्ये एका कामगाराला सुरक्षा साधनाअभावी जीव गमवावा लागलाय.
जिरेगाव येथील देसाई स्टोन क्रेशर येथे कामगार मुकुल सिंग श्रीधर सिंग (वय ४३ वर्षे ) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. सदर व्यक्ती क्रेशर मध्ये कनव्हेअर बेल्ट मध्ये गुंतलेला दगड काढण्यासाठी गेला असता त्यास कोणतीही सुरक्षा उपकरणे दिले नसल्याने सदरचा अडकलेला दगड हाताने काढत असताना दगड पुढे जाण्यासाठी असणाऱ्या कनव्हेअर बेल्ट मध्ये हात गुंतून तो मशीन मध्ये सापडल्याने गंभीर दुखापती होवुन सिंग याचा जागीच मृत्यु झाला.
या क्रॅशर वर कसल्याही प्रकारची सुरक्षा साधने देत नसल्याने कामगारांना काम करताना अनेक दुखापती होत असतात. या घडलेल्या अपघातामध्ये स्टोन क्रशरवर काम करताना सुरक्षेच्या दृष्टीने संबंधित कामगारास हेल्मेट , पायत बुट , हॅण्ड ग्लोज दिले नसून त्यास कनव्हेअर बेल्ट मध्ये गुंतलेला दगड काढण्यासाठी कोणतेही उपकरण दिले नसल्याने सदरचा कामगार जागीच मृत्यु झालेने क्रशर मालक , मॅनेजर व ठेकेदार हे कारणीभुत झाले असल्याने यासंदर्भात कुरकुंभ पोलीस मदत केंद्राचे पोलीस हवालदार शंकर मारीबा वाघमारे यांनी फिर्याद दिली. असून याप्रकरणी पोलिसांनी स्टोन क्रशर मालक अरुण शिवाजीराव देसाई ( रा . सातारा ) , मॅनेजर अमरजित नसीर मुलाणी ( रा . पांगरी , ता . माण , जि . सातारा ) , लेबर ठेकेदार घनश्याम सिंग श्रीधर सिंग ( मूळ रा . किसनपूर , पो . आंबा , ता . शाहकुंड , जि.भागलपूर बिहार ) या तिघांविरुद्ध भारतीय दंड संहिता कलम ३०४ , २८७ , ३४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे . सदर गुन्हयाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुशील लोंढे व पोलीस स्टाफ शंकर वाघमारे , राकेश फाळके , महेश पवार , योगेश गोलांडे
हे करीत आहेत .

*दौंड तालुक्यात असे अनेक खडी क्रेशर आहेत त्यावर देखील अनेक कामगार काम करतात त्यांना देखील सुरक्षा उपकरणे दिली जात नसल्याचं बोललं जातंय असे अपघात घडू नये म्हणून संबंधित क्रेशरांवर संबंधित विभाग काय कारवाई करणार हे पाहणं निश्चित ठरतंय.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!