डहाणू पोलीस ठाणे यांची धडक कारवाई..

डहाणू प्रतिनिधी शिवप्रसाद कांबळे

दि.२०/०१/२०२२ रोजी डहाणू पोलीस ठाणे येथे १०.०० वा चे सुमारास महीला नामे मोनिका विनोद तांडेल वय -२८ वर्षे रा.मांगेलआळी केळवा येथे राहणारी महीला ही तीच्या माहेरी डहाणू गाव येथे आल्याने आज रोजी सदर महीला पोलीस ठाण्याच्या पाठीमागे भाजी मार्केट मध्ये भाजीपाला घेऊन ती डहाणू गाव येथे जाणा – या रिक्षात बसुन गेली असता तीला पारनाका येथे आल्यावर समजले की , तीच्याजवळ असलेली पर्स व पर्स मध्ये असलेली अंदाजे तीन तोळे सोन्याची गंठण व ५००० / – रुपये रोख रक्कम व ई – श्रम कार्ड असे वस्तु असलेली पर्स जवळ नसल्याचे समजताच ती लागलीच डहाणू पोलीस ठाणे येथे येऊन कळविले असता डहाणू पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी पोनि / श्री नामदेव बंडगर साहेब यांनी लागलीच दोन पथके तयार करुन हरविलेल्या पर्स चा शोध घेण्याकरीता पाठविले . पथकात असलेले सफौ / नलावडे , मपोना / कहार , पोशि / साळुंखे यांनी लागलीच परीसरातील सीसीटिव्ही कॅमेरे तपासुन व आपल्या गुप्त बातमीदारांमार्फत शोध घेतला असता ती पर्स वडकुन नाक्यावर एका इसमास सापडले असल्याचे कळाले . सदर इसम नामे रोहीत सुधीर झा वय -२२ वर्षे रा . सरकार नगर जीवदानी मंदिराजवळ विरार पुर्व त्या इसमाचा शोध घेऊन त्या इसमास डहाणू पोलीस ठाण्यात बोलावुन त्यांनी मोनिका तांडेल हीची पर्स व पर्स मध्ये असलेले तीन तोळ्याचे सोन्याचे गंठण व ५००० / – रुपये रोख रक्कम असा मुद्देमाल पोनि / बंडगर साहेब , सफौ / नलावडे , मपोना / कहार , पोशि / साळुंखे यांचे समक्ष परत केले . त्याबद्दल पोनि / बंडगर यांनी रोहीत याचा शॉल व श्रीफळ देऊन सत्कार केला . तसेच मोनिका तांडेल हीने रोहीत यास योग्य ते बक्षिस दिले आहे . डहाणू पोलीसांचे व रोहीत सुधीर झा यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!