
यवत पोलिसांच्या कामगिरीने पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षकांनी दिली कौतुकाची थाप..
[ यवत पोलिसांची ही कामगिरी जनसामान्यात प्रतिमा उंचावणारी आहे ]
दौंड :- आलिम सय्यद,
आपल्या कुशल आणि प्रभावी कामामुळे ‘सिंघम’म्हणून ओळखले जाणारे यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार व त्यांच्या पोलीस पथकाचा बेस्ट डिटेक्शन म्हणून पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ अभिनव देशमुख यांनी यवत पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिल्याने निश्चितच ही कामगिरी जनसामान्यात प्रतिमा उंचावणारी आहे.यवत पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या अनेक गुंतागुंतीच्या व आव्हानात्मक गुन्ह्यांचा पोलीस निरीक्षक नारायण पवार आणि खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या त्यांच्या सहकाऱ्यांनी काही तासांमध्येच तपास लावत अनेक आरोपींच्या मुसक्या आवळून त्यांना जेरबंद केले आहे. यवत पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर आसलेले महाराष्ट्र बँकेचे एटीएम चोरट्यांनी फोडून पोलीसांना एक प्रकारचे आवाहन केले होते.परंतु चारच दिवसात एटीएम फोडीचा गुन्हा उघडकीस आणून चोरीस गेलेली रोख रक्कम १० लाख रुपये रोख व गुन्ह्यातील आरोपी अजय शेंडे राहणार सहजपुर ता.दौंण्ड,शिवाजी उत्तम गरड,ऋषीकेश काकासाहेब किरतिके या आरोपींना यवत पोलिसांनी जेरबंद केले.या धाडसी व यशस्वी कारवाईची दखल घेत जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण पवार यांच्यासह पुणे ग्रामीण गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अशोक शेळके,संदीप येळे
अमोल गोरे,रामेश्वर धोंडगे,
संजय नागरगोजे, तुषार पंदारे,राजू मोमीन,अजित भुजबळ,आसिफ शेख,अजय घुले,प्रमोद नवले,विजय कांचन,चंद्रकांत जाधव,पूनम गुंड,गुरु गायकवाड, निलेश कदम, मारुती बाराते,रामदास जगताप,महेंद्र चांदणे इत्यादी
पोलिसांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली निश्चितच यवत पोलिसांची कामगिरी जनसामान्यात प्रतिमा उंचावणारी आहे.