सावदा-गाते-उदळी रस्त्यावर आयशर अपघातात दोन जखमी एक गंभीर..

राजु तडवी फैजपुर

गाते-उदळी रस्त्यावर स्मशानभुमी जवळ ऑटो रिक्षा घेऊन घरी जात असलेल्या रिक्षास समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या आयशर ट्रक (क्रमांक युपी ७८ एफ एल ६७२९) यांनी जबर ठोस मारली ही घटना २१ रोजी संध्याकाळी साडे ६ वाजता घडली. या अपघातात मेघा शांताराम चौधरी हे गंभीर जखमी झाले, असून जितेंद्र काशिनाथ चौधरी हे जखमी झाले आहेत, दोघे राहणार उदळी येथील असून हे घरी जात होते. जखमींना भुसावळ येथील रिदम हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून अपघात घडताच ट्रक चालक पसार झाला. या अपघाताबाबत दिलीप रामदास तायडे राहणार उदळी खुर्द यांनी फिर्याद दिल्याने सावदा पोलीस ठाण्यात केस नंबर ९/२२ नुसार कलम २७९ वगैरे ने गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक पोलीस निरीक्षक देविदास इंगोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कॉस्टेबल संजय चौधरी तपास करीत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!