
पन्नास लाखाच्या डांबरीकरणाला मुरुमाएवजी माती….
रस्त्याचे काम निकृष्ट…?
दौंड:- आलिम सय्यद
दौंड तालुक्यातील कुरकुंभ गावापासून तेराशे मीटर वर पांढरेवाडी जाधववस्ती पर्यंत रस्त्याचे डांबरीकरण काम निकृष्ट पद्धतीने केले जात असल्याच दिसत आहे.कुरकुंभ ते पांढरेवाडी हद्दीपर्यंत असा चार ते पाच किलोमीटर रास्ता हा पूर्ण खराब झाला आहे परंतु संबंधित विभागाने या रस्त्याचे काम फक्त तेराशे मिटरच काम असल्याने पुढचे काम होणार का असा प्रश्न येथील नागरिक करत आहे .
सदर कुरकुंभ ते पांढरेवाडी या रस्त्याला एक प्रकारे ग्रहणच लागलंय रस्त्याचे काम केले की सहा महिन्यातच रस्ता जैसे ते तैसे होतो. त्यामुळे या रस्त्याचे काम चांगले व्हावे म्हणून अनेक नागरिक या कामाबाबत संबंधित काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना या कामाबाबत विचार पूस करत आहे. परंतु संबंधित कामावर असणाऱ्या सुपरवायजर यांच्या कडे या कामाचे इस्टिमेट देखील नाही मंग हे काम कुठल्या प्रकारे करत आहे जर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनाच माहिती नाही तर काम करतात कसे असा सवाल येथील ग्रामस्थ करत आहे .
या रस्त्याचे काम पुणे जिल्हा परिषद च्या माध्यमातून तेराशे मीटर कामासाठी सुमारे पन्नास लक्ष रुपये निधी असून या रस्त्याच्या कामाला संबंधित ठेकेदार मुरुमा ऐवजी मातीचा वापर केला जात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे अशा कामांना निकृष्टतेचे ग्रहण लागले आहे का असा प्रश्न नागरिक उपस्तिथ करत आहे. सदरचे काम सुरू करून तीन ते चार दिवस उलटले तरी देखील संबंधित शासकीय अभियंता या कामाची पाहणी करण्यास आले नसल्याचं बोललं जातंय. संबंधित शासकीय अभियंता या कामाची पाहणी करण्यासाठी येत नसल्यानं संबंधित ठेकेदार व संबंधीत अधिकारी यांचं काय लागेबंध आहे की काय असा प्रश्न येथील नागरिक करत आहे. या रस्त्याचं काम चांगल्या प्रकारे व्हावे अशी मांगणी येथील नागरिकांची मांगणी आहे
*सदर कामाबाबत शाखा अभियंता पंचायत समिती दौंड जितेंद्र शिंदे यांना माहिती विचारली असता कामाची पाहणी करण्यास येणार असल्याचं सांगितले*