
बंधा – याचे बरगे ( ढापे ) , सिमेंट , ईलेक्ट्रीक मोटरी , चोरी करणाऱ्यांना दौंड पोलिसांनी ठोकल्या बेड्या..
दौंड:-आलिम सय्यद,
दौंड तालुक्यातील बोरीबेल येथील कोल्हापुर पध्दतीचे बंधा – याचे बरगे ( ढापे ) चोरीतील चार आरोपी जेरबंद करीत ३ गुन्हे उघडकीस करण्यात दौंड पोलिसांनी जबरदस्त कामगिरी केली. दौंड पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार १२ लाख ६० हजार रूपयेचा मुद्देमाल जप्त केलाय याबाबत खडकवासला पाटबंधारे विभागाचे दौंड तालुक्यातील बोरीबेल येथील कार्यालयाच्या पाठीमागे कोल्हापुर पद्धतीचे बंधा – याचे पाणी आडवायचे बरगे ( ढापे ) चोरीला गेल्याबाबत पाठबंधारे विभागाचे अधिकाऱ्यांनी फिर्यादी दिली होती यावरून दौंड पोलीस ठाणे येथे अज्ञात इसमांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आल्याने सदर गुन्हयाचा तपास दौंड पोलीस करीत होते . सदर गुन्हयाच्या तपासा दरम्यान पोलीसांना गोपनीय बातमीदारामार्फत माहीती मिळाले वरून त्यांनी गणेश राजु मोरे व अभिषेक प्रमोद निकम या दोन संशयीतांना ताब्यात घेवून त्यांचेकडे गुन्हयाचे अनुशंगाने तपास केला असता त्यांनी सदरचा गुन्हा त्यांच्या साथीदार नामे विकास भिडे , चंद्रकांत पोटे , रूतिक जाधव , स्वप्निल पोटे , बाळु पोटे सर्व राहणार बोरिबेल ता. दौंड जि. पुणे यांच्या सोबत मिळून गुन्हा केला असुन सदर गुन्हयात चोरी केलेला मुद्देमाल भिगवन येथील बाळू पिंगळे याला विकला आहे तसेच इतर ठिकाणी ही सिमेंट , इलेक्ट्रीक मोटरी चोरी केल्या आहेत अशी कबुली दिल्याने सदर आरोपींना गुन्हयाचे पुढील तपास कामी अटक केले असुन त्यांचे कडून अद्याप पर्यंत कोल्हापुर पध्दतीचे बंधा – याचे बरगे ( ढापे ) , सिमेंट , ईलेक्ट्रीक मोटरी , चोरी साठी वापरलेले वाहण असा मिळून एकुण १२ लाख ६० हजार रूपयेचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असुन चोरीची मालमत्ता खरेदी करणारा बाळु पिंगळे याला देखील अटक करण्यात आली आहे . आत्तापर्यंत चार आरोपी अटक करण्यात आले असुन उर्वरीत फरारी आरोपींचा शोध दौंड पोलीस घेत आहेत . सदरची कामगिरी पुणे ग्रामीण पोलीस अधिक्षक डॉ.अभिनव देशमुख , अप्पर पोलीस अधिक्षक मिलींद मोहीते , उपविभागीय पोलीस अधिकारी राहूल धस यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरीक्षक विनोद घुगे , पोलीस उप निरीक्षक शहाजी गोसावी , स.फौ. संतोष शिंदे , पो.हवा . महेंद्र लोहार , पो . हवा सुभाष राउत , पो . ना . निखील जाधव , पो.ना. नारायण वलेकर , पो.कॉ. किशोर वाघ यांनी केली असुन पुढील तपास पो.हवा . महेंद्र लोहार करीत आहेत .