
ओबीसी समाजाला आरक्षण दिले जावु नये म्हणुन मंडल आयोग शिफारसीच्या विरोधात भाजपाने कमंडल यात्रा काढली होती – मेहबुब शेख
राजु तडवी फैजपुर
मंडल आयोगाच्या शिफारसीला विरोध करून कमंडल यात्रा काढणाऱ्या भारतीय जनता पक्षानी ओबीसींना आरक्षण दिले जावु नये म्हणुन पंतप्रधान व्ही .पी. सिंगच्या काळात मंडल आयोगास मोठया प्रमाणावर विरोध केला अशी प्रतिक्रीया यावल येथे आयोजीत शरद युवा संवाद यात्रेच्या निमित्ता राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश अध्यक्ष मेहबुब शेख यांनी व्यक्त केली , भारतीय जनता पक्षाने आपल्याच भारतीय जनता पक्षाला ज्या ओबीसी समाज नेत्यांनी आपल्या अथक परिश्रमातुन पक्ष वाढवले त्या नेत्यांची या पक्षाने आज काय अवस्था केली आहे ते आपण बघत आहोत मग ते एकनाथराव खडसे असो , विनोद तावडे , स्व .गोपीनाथ मुंडे असो चंद्रशेखर बावनकुडे किंवा पंकजा मुंडे असो यांची पक्षात आज परिस्थिती काय आहे हे बघुन खऱ्या अर्थाने ओबीसी समाजाचे शत्रु कोण हे आपल्याला कडेल अशी माहीती शरद युवा संवाद यात्रेच्या निमित्ता आयोजीत कार्यक्रमा प्रसंगी युवकांना मार्गदर्शन करतांना राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मेहबुब शेख यांनी केन्द्रात सत्तेत असलेल्या भारतीय जनता पक्षाच्या कार्यकाळात गगनाला भिडलेली महागाई , ईडीच्या नांवाखाली होत असलेले अनेकांचे शोषण , कर्नाटक , मध्य प्रदेश आणी गोवा या राज्यातील काँग्रेसचे बहुमत असतांना भाजपाने सत्तेचा मोठा दुरुपयोग करून आर्थिक बळावर केलेले सत्ता परिवर्तन या विषयावर भाजपाच्या कारभाराचे चौफेर फटकेबाजी करीत खरपुस समाचार घेतले . यावल येथील यावल तालुका खरेदी विक्री सहकारी संघाच्या आवारात पार पडलेल्या शरद युवा संवाद यात्रा निमित्त आयोजीत या कार्यक्रमास राष्ट्रवादी कॉम्रेस पक्षाचे प्रदेश सरचिटणीस एजाज मलीक, राष्ट्रवादीचे प्रदेश प्रवक्ता योगेश देसले , राष्ट्रवादीचे जिल्हा कार्यध्यक्ष विलास पाटील, राष्ट्रवादी युवकचे जिल्हाध्यक्ष रविन्द्र नाना पाटील , राष्ट्रवादीच तालुका अध्यक्ष प्रा .मुकेश येवले, राष्ट्रवादीचे फैजपुर शहराध्यक्ष अन्वर खाटीक , राष्ट्रवादी आदीवासी सेलचे जिल्हा अध्यक्ष एम बी तडवी सर, यावल शहराचे माजी नगराध्यक्ष अतुल पाटील , माजी प्रभारी नगराध्दक्ष राकेश कोलते, युवकचे यावल शहराध्यक्ष हितेश गजरे , फैजपुर युवक राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष यांच्यासह पक्षाचे विविध पदाधिकारी मोठया संख्येत या कार्यक्रमास उपस्थित होते . कार्यक्रमाची प्रस्तावना युवक राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष अॅड देवकांत पाटील यांनी मांडली सुत्रसंचालन भरत चौधरी यांनी केले .