
ग्रामीण रुग्णालय शेवगाव येथे दिव्यांग प्रमाणपत्र वाटप : चांद शेख
शेवगाव प्रतिनिधी
२२ नोव्हेंबर २०२१ जिल्हा ग्रामीण रुग्णालय अहमदनगर कडून रा बा स्वा का अंतर्गत ग्रामीण रुग्णालय शेवगाव येथे दिव्यांग व्यक्तीने दिव्यांग प्रमाणपत्राकरिता त्रास होऊ नये तसेच दिव्यांग प्रमाणपत्रापासून कोणीही वंचीत राहू नये यासाठी शिबीर घेण्यात आले होेते परंतु शिबीरामध्ये नोंदणी झालेल्या दिव्यांगांना दिव्यांग प्रमाणपत्र बुधवार दि ९ फेब्रूवारी २०२२ रोजी तालुक्यातील ग्रामीण रूग्णालय शेवगाव येथे नोंदणी झालेल्या एकूण 245 दिव्यांग प्रमाणपत्र यामध्ये अस्थिव्यंग 182 तसेच नेत्र 63 यापैकी 72 दिव्यांग प्रमाणपत्र डॉ रामेश्वर काटे वैद्यकीय अधीक्षक ग्रामीण रुग्णालय शेवगाव यांच्या मार्गदर्शनाखाली शंकर सातपुते सहाय्यक अधीक्षक व सदाशिव कराळे कनिष्ठ लिपिक यांनी नेत्र विभाग ग्रामीण रुग्णालय शेवगाव येथे वाटप करण्यात आले.
यावेळी सावली दिव्यांग संघटनेचे चाँद शेख,नवनाथ औटी,उपाध्यक्ष संभाजी गुठे,संघटक अनिल विघ्ने शहर उपाध्यक्ष सुनील वाळके,
भास्कर जाधव यांच्यासह दिव्यांग बांधव व सावली दिव्यांग संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.उर्वरित दिव्यांग बांधवांनी ग्रामीण रुग्णालय शेवगाव येथे जाऊन प्रमाणपत्र हस्तगत करण्याचे आवाहन सावली दिव्यांग संघटनेचे अध्यक्ष चाँद शेख यांनी केले.
चौकट
सावली दिव्यांग संघटनेकडून पाठपुरावा केल्याने दिव्यांग बांधवांना ग्रामीण रुग्णालय शेवगाव नेत्र विभाग येथे प्रमाणपत्र देण्यात आले.
यामुळे दिव्यांग बांधवाना जो अहमदनगर रुग्णालयातुन प्रमाणपत्र घेण्याकरिता येणारा आर्थिक खर्च व त्रास टळला
चांद शेख
सावली दिव्यांग संघटना,अहमदनगर