दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी कायमस्वरूपी विशेष शिक्षकांची नियुक्ती करा: चाँद शेख

शेवगाव प्रतिनिधी युनूस शेख

मुख्यमंत्री साहेब यांना मेलद्वारे तर गटविकास अधिकारी पंचायत समिती शेवगाव यांना सावली दिव्यांग संस्थेचे निवेदन

शेवगाव तालुक्यात अनेक ठिकाणी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा आहेत.देशासह महाराष्ट्र राज्यात कोरोना या वैश्विक महामारीने थैमान घातले त्यामुळे शाळा बंद असून ऑनलाईन शिक्षण पद्धतीने शालेय शिक्षण चालू होते.केंद्र सरकार व राज्य सरकार च्या शालेय शिक्षण धोरणानुसार कलम एकवीस अ नुसार वय वर्ष सहा ते वय वर्ष चौदा वयातील बालकांना मोफत व सक्तीचे अनिवार्य आहे.यानुसार विद्यार्थ्यांना शिक्षण देखील दिले जाते.कोरोना महामारीचा धोका थोडासा कमी झाल्याने शाळा सुरु करण्यात आल्या आहेत. कोरोना काळात शिक्षण घेत असलेल्या बालकांचे अतोनात नुकसान झाले आहे.थोडेफार प्रमाणात सक्षम विद्यार्थ्यांना ऑनलाईन का होईना शिक्षण मिळाले परंतु जे विशेष विद्यार्थी आहेत यांना ऑनलाईन शिक्षण घेत असताना अनेक अडचणी आल्या आहेत.
अंध,अल्पदृष्टी,अस्थिव्यंग, मतीमंद,मूकबधिर, कर्णबधिर व इतर प्रवर्गातील असलेले विशेष विद्यार्थी(दिव्यांग विद्यार्थी) यांना शिक्षण घेत असताना खूप अडचणी येतात.शासनाने विशेष (दिव्यांग) विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी त्यांना उत्कृष्ट पध्दतीने शिक्षण मिळायला पाहिजे याकरिता ठोस पाऊले उचलणे गरजेचे आहे. विशेष(दिव्यांग)विद्यार्थ्यांना शिक्षण देण्यासाठी विशेष शिक्षकांची आवश्यकता असते. परंतु विशेष शिक्षकांची कमतरतेमुळे दिव्यांग विद्यार्थी प्रभावी शिक्षणापासून वंचित आहेत.मुख्यतः विशेष शिक्षक पंचायत समिती मुख्य कार्यालयात असून तेथून विशेष विद्यार्थ्यांसाठी काम करतात.कधी कधी जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत भेट देतात.यात त्यांची पण चूक नाही कारण विशेष शिक्षकांना कंत्राट बेसवर घेतले जाते त्यातही आवश्यकते पेक्षा जास्त कामाचा तान त्याच बरोबर गरजेपेक्षा कमी विशेष शिक्षक असतात.जिल्हा परिषद प्राथमिक शाळेमध्ये कमीत कमी एक तरी विशेष शिक्षक असायला पाहिजे. म्हणजे जे विशेष विद्यार्थी आहे त्यांना चांगल्या प्रकारे प्रभावी शिक्षण मिळेल.त्यामुळे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री साहेब यांच्याकडे सावली दिव्यांग संस्थेचे संस्थापक अध्यक्ष बाबासाहेब महापुरे यांच्या मार्गदर्शनाखाली मागणी करण्यात आली आहे.याबाबत सावली दिव्यांग संस्थेचे उपाध्यक्ष चाँद शेख यांनी मुख्यमंत्री साहेबांना मेल केला असून गटविकास अधिकारी महेश डोके साहेब पंचायत समिती शेवगाव यांच्याकडे चाँद शेख,सुनील वाळके,अशोक गरड यांनी निवेदन दिले आहे.यावेळी सहाय्यक प्रशासन अधिकारी चव्हाण एस पी हे उपस्थित होते.विशेष(दिव्यांग)विद्यार्थ्यांना कायमस्वरूपी विशेष शिक्षकांची नेमणूक करण्यात यावी अशी मागणी सावली दिव्यांग संस्थेचे व संघटनेचे बाबासाहेब महापुरे, चाँद शेख, नवनाथ औटी,संभाजी गुठे, खलील शेख,मनोहर मराठे,बाबासाहेब गडाख,शिवाजी आहेर,भरत साळुंके,गणेश महाजन,गणेश तमानके, बाहुबली वायकर,निर्मला भालेकर,सोनाली चेडे,संजीवनी अदमाने,तसेच दिव्यांग बांधवाकडून करण्यात येत आहे.

जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत पहिली ते आठवी पर्यंत विशेष(दिव्यांग) विद्यार्थ्यांना त्यांच्या शारीरिक योग्यतेनुसार शिक्षण मिळण्यासाठी तसेच उत्कृष्ट व प्रभावी दर्जेदार शिक्षणसाठी महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत विशेष शिक्षकांची कायमस्वरूपी नियुक्ती करण्यात यावी.
चाँद कादर शेख
उपाध्यक्ष सावली दिव्यांग संस्था अहमदनगर महाराष्ट्र राज्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!