
कुरकुंभ MIDC येथे ESIC च्या वतीने आरोग्य तपासणी शिबीर आयोजित..
दौंड :- आलिम सय्यद
दौंड तालुक्यात कुरकुंभ विशेष आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते .
सदरचे शिबीर हे महाराष्ट्र राज्याचे आरोग्य मंत्री तथा प्रधान सचिव सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या निर्देशानुसार भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त महाराष्ट्र राज्य कामगार विमा सोसायटीच्या वैद्यकीय प्रशासन अधिकारी पुणे यांच्या मार्फत आणि ईएसआयसीच्या पुणे येथील एसआरओ ऑफीस व त्यांच्या स्थानिक कार्यालय कुरकुंभ यांच्या सहयोगाने ( ता.२२ )फेब्रुवारी रोजी कुरकुभ एमआयडीसी येथील कुरकुंभ एनव्हायरनमेंटल सोसायटीच्या परिसरात चाळीस वर्षावरील कामगारांची विशेष आरोग्य तपासणी शिबीर आयोजित करण्यात आले होते . या आरोग्य तपासणी शिबीरामध्ये १२७ विमा कामगारांची / महिला कामगार मोफत आरोग्य तपासणी करणयात आली .तसेच ईएसआयच्या टाय अप रुग्णालयाच्या सहयोगाने रक्त तपासणी , ईसीजी व डोळ्यांची तपासणी करण्यात आली . कार्यक्रमावेळी महाराष्ट्र ईएसआयसी सोसायटी ‘ वैद्यकीय प्रशासन अधिकारी पुणे ‘ कार्यालयामधील डॉ . मनिषा मेटे , यांनी याबाबत कामगार तसेच ठेकेदार यांना यावेळी मार्गदर्शन केले .यावेळी डॉ . वाघे , डॉ . आकाश पारेकर ,. महाडिक, कदम , दौंड सेवा दवाखान्यामधील कर्मचारी , ‘ ईएसआयसी स्थानिक कार्यालय कुरकुंभ येथील व्यवस्थापक दिनेश वाघमारे तेथील कर्मचारी , ईएसआय टाय अप रुग्णालय ‘ संचित
हॉस्पिटल ‘ बारामती येथील डॉ . अंजली खाडे व त्यांच्या कर्मचारी कसै वर्ग तसेच कुरकुंभ एमआयडीसी मधील ठेकेदार राजाराम पाटील , एस पी शितोळे, प्रशांत शोरात यावेळी उपस्तिथ होते.