मुस्लिम जमात धार्मिक ट्रस्ट बोधेगाव च्या अध्यक्षपदी इस्माइल् पटेल तर उपाध्यक्षपदी शेरखा पठाण यांची निवड..

शेवगाव प्रतिनिधी युनूस शेख

दि. 28/2/2022 रोजी मुस्लिम जमात धार्मिक ट्रस्ट बोधेगाव या संस्थेची पदाधिकारी निवड उत्साहात पार पडली.अध्यक्ष पदी इसाईल पटेल तर उपाध्यक्षपदी शेरखा पठाण यांची निवड करण्यात आली.इस्माईल पटेल यांना 8 सदस्यापैकी 6 सदस्यांनी पाठींबा दिला तर 2 सदस्यांनी आपले मत नोंदविले नाही.त्यामुळे 6-0 मतांनी अध्यक्ष पदी त्यांची निवड झाली.तसेच उपाध्यक्ष शेरखा पठाण यांना 8 सदस्यापैकी 7 सदस्यांनी पाठींबा एका सदस्याने मत नोंदवले नाही.त्यामुळे 7-0 ह्या मतांनी उपाध्यक्ष पदी त्यांची निवड करण्यात आली.ट्रस्टचे विद्यमान अध्यक्ष फारूक सय्यद यान्ही नूतन पदाधीकारी यांच्याकडे कारभार सोपवून त्यांचा सत्कार केला व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या.तसेच ट्रस्ट चा अधिक विकास करू.प्रगती करू आहे त्यापेक्षा चांगले काम इमाने इतबारे करू सर्वांना सोबत घेऊन चालू असे नूतन पदाधिकारी यान्ही आपले मत मांडले.त्यांच्या निवडीबद्दल मुस्लिम समाजातून आनंद व्यक्त होत आहे.त्याप्रसंगी सभासद बन्नुभाइ शेख सादिक पठाण गफूर तांबोळी.लाल अहमद बागवान मुसाभाई शेख लालाभाई शेख ट्रस्ट कर्मचारी अजीम पठाण व इतर नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!