कोविड-१९ रिलीफ योजना च्या अंतर्गत मृत कामगारांच्या कुटुंबाला पेंशन सुरू..

 

दौंड :-आलिम सय्यद

कामगार राज्य विमा महामंडळ श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार च्या कोविड- १९ रिलीफ योजना च्या अंतर्गत औद्योगिक क्षेत्रात काम करणाऱ्या कामगार हे ई एस आय सी विमा धारक कोविड-१९ मध्ये मृत्यू झालेल्या कामगारांच्या कुटूंबाला पेन्शन योजना मिळाली आहे. यामध्ये कुरकुंभ औद्योगिक वसाहत मधील सोनी सर्व्हिसेस या कंत्राट मध्ये कोविड-१९ मध्ये मृत्यू झालेले कामगार सुनील भगत व विष्णू गायकवाड या कामगारांचा कोविड मध्ये मृत्यू झाला होता. त्यामुळे या कामगारांच्या कुटुंबाला उदरनिर्वाह साठी कामगार राज्य विमा महामंडळ श्रम व रोजगार मंत्रालय भारत सरकार यांनी कोविड -१९ रिलीफ योजने मध्ये कुरकुंभ ESIC कार्यालय येथे पेन्शन प्रमाणपत्र देण्यात आले. यावेळी ESIC कार्यालय कुरकुंभ शाखा व्यवस्थापक दिनेश वाघमारे, सहाय्यक अरविंद कुमार, सोनी सर्व्हिसेस चे एस पी शितोळे, अमोल जाधव, यावेळी यांच्या हस्ते पेन्शन प्रमाण पत्र देण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published.

Don`t copy text!