कुरकुंभ एमआयडीसीतील मेलजर कंपनीतील चोरी उघडकीस आणण्यात दौंड पोलिसांना यश..

दौंड :- आलिम सय्यद

दौंड तालुक्यातील कुरकुंभ औद्योगिक वसाहतीमधील मेलजर कंपनीतील चोरी उघडकीस आणण्यात दौंड पोलीसांना यश आले आहे . कुरकुंभ औद्योगिक वसाहतीतील मेल्जर कंपनीमध्ये ( ता. ५ मार्च २०२२ ) रोजी अज्ञात चोरट्यांनी सुमारे ४८ लाख १० हजार ११४ रुपये किमतीचे 56 ड्रम नायट्रो मिथेन केमिकल चोरीला गेलेबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता . या गुन्हयाचे अनुशंगाने पोलीस निरिक्षक विनोद घुगे यांनी तात्काळ घटनास्थळास भेट देवून तपासाबाबत पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख , अप्पर पोलीस अधीक्षक बारामती मिलिंद मोहिते, दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी राहुल धस यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तयार करून उत्तरप्रदेश , मुंबई , मध्यप्रदेश अशा प्रदेशामध्ये पथके पाठवुन या गुन्हयामध्ये एकूण १० आरोपी निष्पन्न करत त्यांना अटक करण्यात आली आहे . यामध्ये आरोपी शंकर दिनकर झरेकर ( रा.नानविज , ता . दौंड जि . पुणे ) , बिरप्पा मारुती लवटे ( रा . गोपाळवाडी ता . दौंड जि.पुणे ) , ढब्बू भगेला कहार (रा.उत्तरप्रदेश ) , केशव दत्तु रसाळ ( रा.पाटस , ता .दौंड , जि.पुणे ) , विशाल दशरथ शितोळे ( रा.खड़की , ता . दौंड जि.पुणे ) , सचिन संजय गिरमे ( कुरकुंभ दौंड ,जि. पुणे ) सागर मच्छिंद्र बारवकर ( रा. देवळगावगाडा ता. दौंड,जि. पुणे,) महेश तात्यासाहेब गायकवाड, (रा. कुरकुंभ, ता. दौंड, जि. पुणे,) ब्रिजेश रामलवटण यादव (रा. मुंबई, भिवंडी, ) संजय टिटलु यादव ( रा. भिवंडी मुंबई, ) यांना अटक करण्यात आलेली असून या आरोपींकडून १३ लाख ६२ हजार ७२९ रुपयाचे नायट्रो मिथेन केमिकल जप्त करणेत आलेले आहे . या आरोपींना दौंड न्यायालयासमोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना ( ४ एप्रिल ) पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे अशी माहिती पोलिस निरीक्षक विनोद घुगे यांनी दिली . या गुन्हयाचे तपासामध्ये पोलीस निरिक्षक विनोद घुगे , पोलीस उपनिरिक्षक सतिश राऊत , सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक अनिल कोळेकर , पोलीस हवालदार शंकर वाघमारे , पोलिस हवालदार श्रीरंग शिंदे , पांडुरंग थोरात , पोलिस नाईक राकेश फाळके , महेश पवार, पोलिस कॉन्स्टेबल अमोल राऊत यांनी भाग घेतला .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!