रोटरी क्लब च्या वतीने सीईटीपी मधील कामगारांचे आरोग्य तपासणी तसेच कामगारांचा सन्मान..

दौंड:- आलिम सय्यद

दौंड तालुक्यातील कुरकुंभ येथे रोटरी क्लब ऑफ कुरकुंभ एमआयडीसी यांच्या वतीने सीईटीपी, या सोसायटी मधील काम करणारे कामगार यांचे आरोग्य तपासणी करण्यात आली. यामध्ये कामगारांचा बी पी , शुगर, रक्त असे अनेक प्रकारची तपासणी यावेळी करण्यात आली. तसेच यावेळी कामगारांना काम करताना अनेक प्रकारची इजा होत असते त्यामुळे कामगारांना टिटी चे इंजेक्शन देण्यात आले. तसेच आज पर्यंत या कामगारांनी कोरोना मध्ये देखील कामावर हजर होता काम केल्याने तसेच सीईटीपी या सोसायटीच्या माध्यमातून केलेल्या सेवे बद्दल रोटरी क्लब ऑफ कुरकुंभ एमआयडीसी च्या वतीने या कामगारांचा सन्मान पत्र देऊन सन्मानित करण्यात आले. हा कार्यक्रम कुरकुंभ एमआयडीसी कार्यालय येथे संपन्न झाला. तसेच
यावेळी डॉ. राजेश दाते यांनी कामगारांना तसेच सर्व उपस्थितांना आरोग्य विषयक माहिती दिली. यावेळी रोटरी क्लब अध्यक्ष मनीष अग्रवाल , सचिव सुनील ठोंबरे, माजी अध्यक्ष फुलचंद ढोरे, विकास टोपले, अरुण कुलगुड, कुरकुंभ ग्रामपंचायत उपसरपंच तसेच रोटरी क्लब चे सदस्य विनोद शितोळे, युवराज घागरे, दीपक कल्याणी, शशिकांत पाटील, नरसिंग थोरात, डॉ. राजेश दाते, अशोक नेहे, किशोर पाटील, राजेंद्र जगदाळे, योगिणी पाटेकर, यावेळी उपस्तिथ होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!