
पांढरेवाडी येथे पंचायत राज दिन निमित्त विशेष ग्रामसभा तसेच बालग्राम सभा चे आयोजन..
कोरम अभावी विशेष ग्रामसभा रद्द.
दौंड:- आलिम सय्यद,
दौंड तालुक्यातील पांढरेवाडी येथे पंचायत राज दिना निमित्त मुला – मुलींचे ,शिक्षण व संगोपन समतेचा विचार याबाबत पुणे जिल्हा अधिकारी व जिल्हा परिषद पुणे यांच्या आदेशा नुसार दौंड पंचायत समिती बालविकास प्रकल्प अधिकारी अक्षदा शिंदे, सुपरवायझर संगीता खलाटे यांच्या मार्गदर्शनाखाली दोन दिवसापूर्वी शाळेतील विद्यार्थ्यांना विविध विषयांवर मार्गदर्शन केले होते. तसेच रविवारी विशेष ग्रामसभेमध्ये बालग्राम सभा आज ग्रामपंचायत पांढरेवाडी मध्ये घेण्यात आली या वेळी गाव ची विशेष ग्रामसभा घेण्यात आली होती परंतु कोरम अभावी सदरची ग्रामसभा रद्द झाली या सभेच्या आधी बालग्राम सभा घेण्यात आली या वेळी शाळेतील विद्यार्थ्यांनी विविध विषय मांडले मुलांना येणारे विविध विषयी प्रश्न मुलींसाठी चेंजिग रूम, सी सी टी व्ही कॅमेरा, दुरून येणा-या मुलांसाठी सायकल मिळावी ,मुलांना टोपी,पिण्यासाठी स्वच्छ पाणी नियमित असावे असे प्रश्न अनुष्का जाधव, अनन्या कोंडे, वैष्णवी जाधव,प्रज्ञा जगताप, श्रेया जाधव,रुद्र जाधव,प्रिया ठोंबरे या विद्यार्थ्यांनी बालग्रामसभेत मांडले. या विद्यार्थ्यांनी आपले प्रश्न मांडण्यासाठी वेगळ व्यासपीठ मिळल्याचा आनंद झाला होता. मुलांना ग्रामपंचायत तर्फे खाऊ देण्यात आला या वेळी मुलांना प्रश्नाना उतर सरपंच छाया झगडे यांनी आपल्या प्रश्नांची आम्ही मासिक सभेत विषय घेऊन मार्गी लाऊ या वेळी उपस्थित सरपंच छाया झगडे, उपसरपंच रोहनी बनकर, पोलीस पाटील विलास येचकर, ग्राम सेवक संजय यादव, जि प शिक्षिका मंजिरी बिडवे, अंगणवाडी शिक्षिका अमिना सय्यद, अलका गायकवाड, ग्राम पंचायत सदस्य नितीन जाधव, विशाल जगताप, संतोष चव्हाण, पत्रकार आलिम सय्यद, माझी सरपंच सुरेश निंबाळकर, व सामाजिक कार्यकर्ते अभिमान निंबाळकर, चंद्रकांत जाधव, नानासो झगडे, आदी ग्रामस्थ उपस्थित होते.