
कृषी विज्ञान केंद्र, दहिगाव-ने च्या वतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन
कृषी विज्ञान केंद्र, दहिगाव-ने च्या वतीने शेतकरी मेळाव्याचे आयोजन
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्ताने व किसान भागीदारी प्राथमिकता हमारी या मोहिमे अंतर्गत श्री मारुतराव घुले पाटील शिक्षण संस्थेचे कृषी विज्ञान केंद्र, दहिगाव ने येथे उद्या मंगळवार दिनांक २६ एप्रिल २०२२ रोजी भव्य शेतकरी मेळावा व कृषी प्रदर्शन चे आयोजन करण्यात आले आहे.
खरीप हंगाम २०२२ च्या अनुषंगाने शेतक-यांना भेडसावना या समस्या खरीप हंगामाचे योग्य नियोजन, सेंद्रिय शेती, या प्रमुख विषयावर संबंधित विषयाचे तज्ञ यावेळी मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सह.सा.का.लि., भेंडाचे चेअरमन मा. आ. डॉ. नरेंद्रजी घुले पाटील तर उद्घाटक म्हणून शिर्डी लोकसभा मतदार संघाचे मा. खा. सदाशिवराव लोखंडे हे उपस्थित राहणार आहेत. तसेच लोकनेते मारुतराव घुले पाटील ज्ञानेश्वर सह.सा.का.लि. चे माजी चेअरमन मा. आ. श्री. चंद्रशेखर घुले पाटील, व्हा.चेअरमन मा. आ. श्री. पांडुरंग अभंग, सभापती पंचायत समिती शेवगाव चे मा. डॉ. क्षितीज घुले पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.
डॉ. संदिप लांडगे महात्मा फुले कृषि विद्यापीठ राहुरी हे ऊस पिकातील हुमणीचे एकात्मिक व्यवस्थापन या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत तर श्री. शिवाजीराव जगताप जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी अहमदनगर खरीप हंगामाचे नियोजन व कृषी विभागाच्या विविध योजना या विषयावर, डॉ. प्रशांत नाईकवाडी अध्यक्ष रोमीफ फौंडेशन पुणे हे भारतीय नैसर्गिक व सेंद्रिय शेती या विषयावर तर श्री. राजाराम गायकवाड प्रकल्प उपसंचालक आत्मा, अहमदनगर हे आत्मा चे योजना बद्दल माहिती देणार आहेत. कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. एस. कौशिक हे तृणधान्य, गळीतधान्य आणि जैवसंतृप्त पिकांवर मार्गदर्शन करणार आहेत. या शेतकरी मेळाव्याचे ठिकाण कृषी विज्ञान केंद्राजवळ रेणुका मंगल कार्यालय, दहिगाव-ने ता. शेवगाव हे असून या मेळाव्याची सुरुवात सकाळी ९.३० वाजता होणार आहे. यावेळी कार्यक्षेत्रातील प्रगतशील शेतक-यांचा सन्मान करण्यात येणार असून जास्तीत जास्त शेतक-यांनी या मेळाव्यास हजर राहावे असे आवाहन कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख व वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. एस. एस. कौशिक यांनी केले आहे.