अहमदनगर येथील घुले पाटील महाविद्यालयाची गड- किल्ले संवर्धन,स्वच्छता शैक्षणिक दौरा पूर्ण.

जनता शिक्षण प्रसारक मंडळाचे, मारुतरावजी घुले पाटील कला, वाणिज्य व शास्त्र महाविद्यालय, अहमदनगर येथील राष्ट्रीय सेवा योजना,इतिहास विभाग व भूगोल विभाग अंतर्गत गड-किल्ले संवर्धन व स्वच्छता मोहीम अंतर्गत प्रकल्प क्षेत्र भेट उपक्रम घेण्यात आला.या क्षेत्रभेटी मध्ये विद्यार्थ्यांनी दौलत मंगळगड (भुलेश्वर),किल्ले पुरंदर, नारायणपूर,प्रतिबालाजी, जेजुरीगड,मोरगाव गणपती आदी ठिकाणी भेट देऊन स्वच्छता करण्यात आली.या मोहिमेमध्ये दौलत मंगळगड येथील प्राचीन पांडवकालीन भुलेश्वर हेमाडपंथी शिवमंदिर आहे.या मंदिराच्या आतील बाजूस रामायण-महाभारतातील युद्धप्रसंग,द्रौपदी-स्वयंवर, शरपंजरी भीष्म, हत्तीला आकाशात फेकणारा भीम ही कथाशिल्पे अधिक जिवंत वाटतात. मातृकादेवी, गणपती, विष्णूंचे अवतार, योद्धे,पक्षी इत्यादी विविध प्रकारचे शिल्पांकन मंदिरात कोरले आहेत. तसेच मुख्य द्वारावरती सुंदर नक्षीकाम व भव्य नंदी यामुळे मंदिराच्या सौंदर्यात भर पडली आहे.मकर संक्रांतीच्या दिवशी मंदिरातील शिवपिंडीवर सूर्यकिरण थेट जाऊन पडते त्यामुळे या मंदिराचे आकर्षण सर्वांनाच वाटते. या बरोबरच विद्यार्थ्यांनी किल्ले पुरंदर येथे मुरारबाजी यांच्या पराक्रमाचे स्मरण करून त्यांच्या पुतळ्यास अभिवादन केले.तसेच छत्रपती संभाजी महाराज यांच्या जन्मस्थळाला भेट दिली. या गडावर घडलेले अनेक प्रसंग, मराठ्यांनी फत्तेखानाशी दिलेली झुंज या लढाईत मराठ्यांना मोठे यश मिळाले.वज्रगडावरून होणारे तोफांचे हाल्ले,माचीवर खानाचे आणि मुरारबाजीचे घनघोर युद्ध, पुरंदरचा तह अशी ऐतिहासिक स्थळाविषयी इतिहास विभाग प्रमुख प्रा.एस.व्ही.मरकड यांनी ऐतिहासिक दाखले देत विद्यार्थ्यांना माहिती दिली. तसेच धार्मिक पर्यटनाच्या माध्यमातून श्री.क्षेत्र नारायणपूर येथील दत्त मंदिर,केतकवळे येथील प्रतिबालाजी मंदिर,महाराष्ट्राचे आराध्य दैवत जेजुरी गड येथे विद्यार्थ्यांनी भंडाऱ्याची उधळण करून येळकोट येळकोट जय मल्हार जयघोष करून खंडेरायाचे दर्शन घेतले.तसेच या क्षेत्रभेटीच्या अष्टविनायकातील मोरगावच्या मयुरेश्वराचे दर्शन अखेर घेऊन या धार्मिक स्थळाविषयी विद्यार्थ्यांनी माहिती घेतली.यावेळी राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी प्रा.डॉ.के.आर.पिसाळ यांनी विद्यार्थ्यांना गड-किल्ले व धार्मिक स्थळे संवर्धन व स्वच्छतेबद्दल संदेश देऊन त्यांच्यामध्ये संवर्धनाची व स्वच्छतेची विद्यार्थ्यांमध्ये जाणीव निर्माण केली.आपल्या ऐतिहासिक स्थळांची जपवणूक करताना गड- कोटांवर नावे लिहू नयेत.तसेच अनेक पर्यटक पाण्याच्या प्लास्टिक बाटल्या, खाद्यपदार्थ,प्लास्टिक,रद्दी आदी वस्तू गडावर टाकून गडकोटांच्या सौंदर्यात हानी पोहोचवतात.तसेच गडावरील दगड,माती,जुन्या वस्तू,मुर्ती विद्रुप करतात अथवा घेऊन जातात.या संदर्भात आपण सर्वांनी जागरूक राहने गरजेचे आहे.आपला ऐतिहासिक वारसा व स्थळे ही पुढील पिढ्यांसाठी प्रेरणादायी व मार्गदर्शक ठरतील यासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे आहे.तसेच भूगोल विभाग प्रमुख प्रा.एम.एल.कराळे यांनी विद्यार्थ्यांना या पर्यटनाविषयी कात्रज घाट,दिवे घाट,डोंगर रांगेवरील पुरंदर,वज्रगड,दौलत मंगळगड याच्या भौगोलिक क्षेत्राबद्दल माहिती दिली.महाविद्यालयाच्या अभ्यास पूर्ण गड-किल्ले संवर्धन व स्वच्छता शैक्षणिक दौरा यशस्वितेसाठी प्रा.डॉ.के.आर. पिसाळ प्रा.एस.व्ही.मरकड,प्रा.एम.एल.कराळे प्राध्यापिका एम.बी.आढाव,श्री.आर.आर. ताकपेरे तसेच भाग्यश्री राख,रोहित प्रभूने,ओमकार वारे,निकिता तांगडे,विशाखा ससे, अर्चना शिंदे,समीक्षा कांबळे, महेश आमले,उमेश ठोंबरे,प्रतिभा टेकुळे,अंकित केदारी,संकेत निमसे,सिद्धार्थ करंडे,रुक्मिणी उगलमुगले,प्रकाश बाचकर, शिवम ढगे स्वयंसेवक विद्यार्थ्यांसह आदी विद्यार्थ्यांनी गड-किल्ले स्वच्छतेमध्ये सहभाग घेऊन स्वच्छतेचा संदेश दिला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.ए.के. पंदरकर व संस्था विश्वस्त डॉ.क्षितिज घुले पाटील यांनी या क्षेत्रभेटी बद्दल सर्व विद्यार्थ्यांचे कौतुक केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!