महाराष्ट्र शासन राष्ट्रीय सेवा योजनेचा सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार ऋषिकेश चव्हाणला…

महाराष्ट्र शासन राष्ट्रीय सेवा योजनेचा सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार ऋषिकेश चव्हाण यांना प्रदान
राज्यस्तरावर राज्याच्या रौप्य महोत्सवी वर्षापासून राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत पुरस्कार देण्याची प्रथा सन १९९३-९४ या सालापासून सुरु करण्यात आली आहे. त्यानुसार महाराष्ट्र राज्यातील सर्व विद्यापीठांकडून प्रस्ताव मागविण्यात येतात व त्या प्रस्तावाची निवड राज्यस्तरीय पुरस्कार निवड समितीच्या शिफारशीतून केली जाते. राष्ट्रीय सेवा योजनेमध्ये दरवर्षी निस्वार्थ भावनेने व निष्ठेने समाजाची सेवा करणाऱ्या व त्यांच्या अंगीकृत कामात प्रोत्साहन मिळावे व त्यांच्या निस्वार्थ सेवेचा यथोचित गौरव करण्याच्या दृष्टीने दरवर्षी रा.से.यो. राज्यस्तरीय पुरस्कार राज्य शासनाच्या वतीने देण्यात येतो.
शेवगाव येथील न्यू आर्ट्स कॉमर्स अँड सायन्स कॉलेजचा रा.से.यो. स्वयंसेवक श्री. ऋषिकेश रामदास चव्हाण याला राष्ट्रीय सेवा योजना अंतर्गत सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल मा. ना. उदय सामंत मंत्री, उच्च व तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र राज्य यांच्या हस्ते मंगळवार, दि. २५ एप्रिल २०२२ रोजी दुपारी १.३० वा. पाटकर सभागृह श्रीमती ना. दा. ठाकरसी विद्यापीठ, चर्चगेट, मुंबई येथे राज्यस्तरीय रासेयो उत्कृष्ट स्वयंसेवक हा पुरस्कार देवून सन्मानित करण्यात आले.
ऋषिकेश चव्हाण यांनी राष्ट्रीय, राज्य, विभाग, विद्यापीठ, जिल्हा, तालुका आणि महाविद्यालयीन स्तरावर विविध शिबिरांमध्ये सक्रीय सहभाग घेउन राष्ट्रीय सेवा योजनेत भरीव कामगिरी केल्याबद्दल तसेच स्वतःच्या अंगी असलेल्या पखवाज, ढोलकी वाद्य या वादनातून विविध सांस्कृतिक शिबिरांमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. त्यांच्या या अनमोल कार्याचे फलित म्हणून त्यांना हा राज्यस्तरीय सर्वोत्कृष्ट स्वयंसेवक पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे. त्याच्या या यशाबद्दल जिल्हा मराठा विद्या प्रसारक समाजाचे अध्यक्ष मा. नंदकुमार झावरे, उपाध्यक्ष मा. रामचंद्र दरे, सचिव जे. डी. खानदेशे, सहसचिव अॅड. विश्वासराव आठरे, खजिनदार डॉ. विवेक भापकर यांनी ऋषिकेशचा गौरव करून पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. तसेच त्याला महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. पुरुषोत्तम कुंदे, उपप्राचार्य डॉ. वाय. एस. सुडके व कार्यक्रम अधिकारी डॉ. संदीप मिरे, विद्यार्थी कल्याण अधिकारी डॉ. गोकुळ क्षीरसागर ,डॉ.रविद वैद्य, डॉ.अनिता आढाव या सर्वांचे मार्गदर्शन लाभले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!