
वंचित बहुजन आघाडी शेवगाव तर्फे नुपूर शर्मा चा जाहीर निषेध…
शेवगाव प्रतिनिधी
आज वंचित बहूजन आघाडी तर्फे वंचित बहूजन आघाड़ीचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष प्रा किसन चव्हाणसर यांच्या नेतृत्वाखाली मा तहसीलदार वाघ साहेब व शेवगांव पोलीस निरीक्षक मा पुजारी साहेब यांना *प्रेषित मोहम्मद सल्ललाहुअलैवसल्लम यांच्या बाबत अतिशय अभद्र व बेताल वक्तव्य करुन देशा मध्ये जातीय तेढ निर्माण करणारे भाजपाचे प्रवक्ते महीला नुपुर शर्मा व नविन जिंदल यांच्या वर यु ऐ पी ए अतंर्गत देश द्रोहाचा गुन्हा दाखल करा* असे लेखी निवेदन देण्यात आले या प्रसंगी वंचित बहूजन आघाड़ीचे शेवगांव तालुका अध्यक्ष शेख प्यारेलालभाई, लक्ष्मण मोरे, युवा कार्यकर्ते सईद शेख, इरफान पठाण, आलिम बरकत टी अब्बू जहागीरदार बाळासाहेब भोसले,रियाजभाई शेख, मुन्ना सैय्यद, अझहर इस्माईल शेख,शैबाज काजी,अक्षय शिंदे,,राजूभाऊ नाईक, विशाल ईंगळे, शेख सलीम जिलानी,शेख शफिकभाई, अज्जू भाई कुरैशी, शेख जब्बार भाई,अस्लम पठाण, शेख इस्माईल भाई,व ईतर सामाजिक कार्यकर्ते व मुस्लिम युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी शेख प्यारेलालभाई म्हणाले की, आज आपल्या देशाची बिकट परिस्थिती आहे देशाचा विकास न करता देश भकास झाला आहे भाजपा चा खरा चेहरा जनते समोर आलेला आहे देशातील मुख्य प्रश्न सोडून भाजपा मधील मनूवादी पिलावळ देशात अशांतता निर्माण करतात व फक्त हींदू मुस्लिम करतात बेताल वक्तव्य करुन समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचेच उद्योग हे मनूवादी करतात सर्व जगामध्ये आपल्या देशाची अब्रू घालवणार्या नुपुर शर्मा व नविन जिंदल यांना त्वरित कायदेशिर कारवाई करुन यू ए पी ए अतंर्गत जेल मध्ये टाकले पाहीजे या मुळे असे धार्मिक तेढ निर्माण करणारे व धार्मिक भावना दुखावणारे वक्तव्य करण्याची हिमंत कोणी करणार नाही ..