
जव्हार शहरात चोरांचा सुळसुळाट….
जव्हार
गेल्या दोन ते तीन वर्षांपासून जव्हार शहरात चोरीच्या प्रमाणात फारच वाढ झालेली आहेत यामध्ये प्रामुख्याने घरफोडी दोन चाकी मोटर सायकल , चार चाकी वाहने, तसेच मोबाईल चे दुकान , तसेच प्रामुख्याने बीएसएनएल ऑफिस मध्ये दर चार ते पाच दिवसात चोरी होणे येथील तांबा पित्तल ॲल्युमिनियमचे वायरीला भंगार बाजारात चांगला भाव मिळत असल्याने भुरटे चोर या ठिकाणी वारंवार चोरी करत असतात गेल्या आठवड्यात बीएसएनएलचे खाजगी ठेकेदार सुनील जाधव यांनी आपल्या सोबत काम करणारे कर्मचाऱ्या बरोबर दोन स्थानिक चोरांना जव्हार ते पालघर बस मधून मुद्देमाला सगट पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले या दरम्यान चोरांवर
8–6-2022 रोजी भारतीय दंड सहिता कलम 454 , 380 , 201 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे ..
दरम्यान काही दिवसांपूर्वी अयाज मेमन यांची क्रेटा कार इमरान चाबुकस्वार यांची क्रेटा कार तसेच तीन दिवसापूर्वी शैलेश यांचीही क्रेटा कार चोरण्याचा प्रयत्न केला गेला परंतु या नवीन मॉडेल चे सेन्सर सिस्टम असलेले कार चोरांना लंपास करता आले नाही,
दरम्यान पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे यांच्या आदेशा खाली कित्येक चोरांना जेरबंद करून फौजदारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे ,
त्यामुळे चोरांची संख्या काही दिवसांपूर्वी कमी झाली होती परंतु गेल्या दोन वर्षांपासून कोरोना महामारी च्या संकटामुळे जिल्ह्यातील फारसा रोजगार संपुष्टात आल्याने चोरांची संख्या परत वाढली असल्यामुळे जव्हार शहरातील नागरिक त्रस्त झाले आहे,
म्हणून जव्हार शहरातील नागरिकांची पोलिसांकडे एकच मागणी आहे यासर्व गॅंगला लवकरात लवकर पकडून कठोर कारवाई करावी …
जेणेकरून शहरातील नागरिकांच्या मनातील होणारी दहशत तसेच होणारे नुकसान तसेच होणारा मानसिक त्रास हा कुठेतरी कमी होईल।..
प्रतिनिधी जहीर शेख सह दर्शन पाडवी जव्हार।……