दहावीचा निकाल पाहण्या आधीच घेतला जगाचा निरोप.

जव्हार:- जव्हार तालुक्यातील वडपाडा या ठिकाणी हृदय हेलावून टाकणारी घटना घडली असून, एका अल्पवयीन मुलीची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली. सदर मुलीने १० वी ची परीक्षा दिली होती १७ जुन २०२२ रोजी दहावीचा निकाल लागला. तीला ६८ टक्के मार्क मिळवून ती पास झाली. दहावीचा निकाल पाहण्या आधीच क्रूर नराधमांनी तिच्यावर अत्याचार करून तिचा खून केला होता. आज दिनांक १८ जून २०२२ रोजी शिवसेनेचे पालघर जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांनी पीडित कुटुंबाची भेट घेऊन सात्वन केले. अल्पवयीन मुलगी घरात मोठी असून तिला १२ वर्षाची बहीण असून ६ वर्षाचा लहान भाऊ व आई-वडील असे कुटुंब आहे. घरात मोठी असल्याने सर्व घरकाम तीच करायची. तसेच अभ्यासात देखील ती खूप हुशार होती. आई-वडिलांना प्रपंचाला हातभार लावावा यासाठी एखाद्या बांधकामाच्या कामावर मोलमजुरीसाठी जायची व आपल्या प्रपंचाला हातभार लावायची. शिक्षण घेऊन आपल्या कुटुंबाला गरिबीतून वर आणण्याची तिची महत्वकांक्षा होती. ती कुटुंबाचा आधार होती. दिनांक १४ जुन २०२२रोजी सकाळी ९ वाजता ती आपल्या शेतावर गेली होती. तिथूनच ती बेपत्ता झाली. तिच्या कुटुंबियांनी तिचा शोध घेतला, परंतु ती सापडली नाही. त्यामुळे जव्हार पोलीस स्टेशनला याबाबत तक्रार करण्यात आली. अखेर दिनांक १५ जुन २०२२ रोजी ४ वाजता तिचा मृतदेह गावकऱ्यांना खडखड ग्रामपंचायतीच्या हद्दीतील तांबडमाळ या ठिकाणी सापडला. दगडाने ठेचून तीची हत्या करण्यात आली होती.प्रथम दर्शनी तिच्यावर बलात्कार झाल्याचा संशय असुन शवविच्छेदनाचा अहवाल प्रतीक्षेत आहे. सदर घटने बाबत जव्हार पोलीस स्टेशनला भादवि कलम ३०२,२०१,३४१ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असुन कलमामध्ये अधिक चौकशी अंती अधिक वाढ होणार असल्याचे पोलीस निरीक्षक आप्पासाहेब लेंगरे यांनी सांगितले. उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत परदेशी यांच्या नेतृत्वाखाली त्यांच्या टीमने दोनच दिवसात गुन्ह्याची उकल केली असून, तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. आज दिनांक १८जुन २०२२ रोजी शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य प्रकाश निकम यांनी पीडित कुटुंबाची भेट घेतली व त्यांना सांगितले की, शिवसेना तुमच्यासोबत आहे. यावेळी त्यांनी पिडीत कुटुंबाला आर्थिक मदत सुद्धा केली. मुलीच्या आई वडिलांनी आरोपींना कठोरात कठोर फाशीची शिक्षा व्हावी अशी मागणी केली आहे…….प्रतिनिधी जहिर शेख सह दर्शन पाडवी जव्हार।……..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!