
शिवसेनेचा वर्धापनदिन उत्साहात साजरा…
जव्हार दी .१९- १९ जुन २०२२ रोजी शिवसेना पक्षाचा ५६ वा वर्धापन दिवस गांधी चौक जव्हार येथे खूप आनंदाच्या वातावरणात संपन्न झाला . शिवसैनिकांमध्ये वर्धापन दिनाच्या दिवशी मोठ्या प्रमाणात उत्साहाचे वातावरण बघायला मिळाले.
जव्हार शहरातील मध्यवर्ती ठिकाण असलेल्या गांधी चौक येथे महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज ,
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे,धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले.
जव्हार नगरीचे नगराध्यक्ष चंद्रकांत पटेल यांच्या हस्ते पक्षाच्या भगव्या झेंड्याचे ध्वजा रोहण करण्यात आले. तर उप तालुका प्रमुख अरशद कोतवाल यांच्या हस्ते हिंदुरुदय सम्राट मा. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला.
माजी तालुका प्रमुख विजय अंभिरे यांनी धर्मवीरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला.
तर शिवसेना शहर प्रमुख परेश पटेल यांनी श्रीफळ वाढवून कार्यक्रमाला सुरुवात केली.
या वेळी शिवसेनेचे माजी नगराध्यक्ष श्री दिनेश भट, उप तालुकाप्रमुख इरफान शेख,अनंता घोलप,उप शहर प्रमुख साईनाथ नवले, प्रशांत वनमाळी, हितेंद्र चोथे, गजानन सहाणे, युवा सेनेचे भूषण शिरसाठ ,नगर सेवक स्वप्नील औसारकर,प्रसन्न भोईर, मुस्लिम सेलचे शकील कुनमाली,अझर फरास,आसिफ घाची ,मोहसिन चाबुकस्वार यांच्या सह अनेक आजी माजी शिवसैनिक हजर होते.
या वेळी जेष्ठ शिवसैनिक प्रकाश चुंबळे (सर ) यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले व सर्व शिवसैनिकांनी प्रतिमांचे पूजन केल्या नंतर कार्यक्रमाची सांगता करण्यात आली. प्रतिनिधि जहिर शेख सह दर्शन पाडवी जव्हार।…….