जव्हार शहरातील भगवान जोशी यांचे घर आग लागून पूर्णपणे खाक …

दि. १९-६- २०२२ रोजी
रात्री सुमारे १-३० वाजता जव्हार शहरात अंबिका चौक येथील भगवान जोशी यांच्या घराला अचानक मोठी आग लागली.
ही आग विझवण्यासाठी घटनास्थळी जव्हार नगर परिषदेतील अग्निशामक दलाची गाडी वेळेवर येऊन पोहोचली
परंतु खेदाची बाब अशी की या गाडीमध्ये पाणीच नव्हतं आजूबाजूचे लोकांनी त्वरित स्थानिक जलवाहक करणारे ए जे वॉटर सप्लायर चे मालक जहीर शेख यांच्यासोबत संपर्क साधला असता जहीर शेख यांनी कुठल्याही प्रकारचा विचार न करता ताबडतोब राज हेमंत पहाडी याच्याबरोबर आपले मालकीचे दोन्ही टॅंकर घेऊन घटनास्थळी पोहोचले आणि आपल्या टॅंकरमधून अग्निशामक दलाच्या गाडीत पाणी टाकून मग आग विझवण्याचे कामाला सुरुवात झाली.
त्यानंतर त्याच्या पाठोपाठ लालू भट्टड व सुमित तारापूर वाला यांच्याही मालकीचे टॅंकर घटनास्थळी पोहोचले आणि सर्व गावकऱ्यांच्या मदतीने सतत तीन ते चार तास परिश्रम करून आग विझवण्यात यश आले.
दरम्यान घर मालक भगवान जोशी यांचं लाखो रुपयांचे घर सामान महत्वाचे कागदपत्र जळून खाक झाले आहे.
दरम्यान अग्निशामक दलाचे जवान तसेच दलाची गाडी जागेवर होती म्हणून आग विझवण्यात आली.
परंतु नगरपरिषदेचे अत्यावश्यक सेवा करणारे पाणीपुरवठा अभियंता कुठे झोपा काढत होते यांच्या हलगर्जीपणामुळे मोठा अपघात झाला असता व जीवित हानी ही झाली असती हे नाकारता येत नाही ।…. प्रतिनिधी जहीर शेख सह दर्शन पाडवी।….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Don`t copy text!