
एक अनोखा उपक्रम गोखले एज्युकेशन सोसायटी महाविद्यालय येथे करण्यात आला…
आज दिनांक २१-६-२०२२ रोजी आंतरराष्ट्रीय योगा दिवस आहे, तसेच मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय याला शंभर वर्ष पूर्ण झाले आहेत,
सीटी सी. एस. एम.वी. एस.शंभर वर्ष शताब्दी प्रदर्शन १० जानेवारी २०२१ रोजी आपला 100 वर्षांच्या गौरवशाली प्रवास पूर्ण केला आहे,
आणि त्या अनुषंगाने सी. टी. एस .एम. वी. एस.म्युझियम ऑल व्हील हा उपक्रम राबविण्यात येत आहे. हा उपक्रम काय आहे,
हा उपक्रम सुरू करून सहा वर्षे पूर्ण झालेले आहेत.
या उपक्रमाद्वारे जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचणे हा संग्रहालयाच्या उद्देश आहे अत्याधुनिक साधनांनी युक्त अश्या दोन बसेसची व्यवस्था केलेली आहे ,
या बसेस शहरात विविध ठिकाणी उपनगरांमध्ये तसेच ग्रामीण भागातीही जात असतात,
ज्यामध्ये विविध विषयावरील प्रदर्शने भरली जातात या बसेस वातानुकूलित असून त्यामध्ये कलाकृतीचे प्रदर्शने करण्यासाठी आवश्यक अशा सोकेशचे इंटरॅक्टिव्ह डेमो किट दृक्श्राव्य संसाधने आणि डिजिटल माध्यम युक्त साधने उपलब्ध आहे
या बसेस मध्ये प्रवेश करण्यासाठी विकलांग व्यक्तीसाठी किंवा व्हीलचेअर वापरणार्या व्यक्तीसाठी आवश्यक अशी व्यवस्था आहे,
ही सर्व प्रदर्शने आणि त्यासोबतच हा एक कार्यक्रम विनामूल्य आहे,
या बसेस महाराष्ट्र, गोवा , गुजरात, कर्नाटक ,या राज्यामध्ये शहरी अथवा ग्रामीण भागात नेल्या जातात..
शाळा महाविद्यालय सांस्कृतिक संस्था संग्रहालये ऐतिहासिक महत्त्वाची जागा तसेच रहिवासी सोसायटी मध्येही या बसेस बोलावल्या जाऊ शकतात..
ज्यामुळे मुलांना परिवारास व समुदायांना या प्रदर्शनाचा लाभ होईल यातील पहिल्या बससाठी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालयाने सहाय्य केले आहे..
तर सिटी. समूहाने ही उपक्रम राबवण्यासाठी आर्थिक सहकार्य केले आहे.
२०१९ मध्ये सिटी च्या सहाय्याने दुसरी बस सामील केली गेली..
हे बसेस सुरक्षित आहेत व सरकारी सूचना covid-19 संबंधितांच्या सर्व नियमानुसार वेळोवेळी स्वच्छ ही केले जातात.
Covid-19 विषयीक सर्व नियमाचे पालन केले जातात..
या उपक्रमाचा कार्यक्रम दि.२१-६-२०२२ ते २२-0६-२०२२ पर्यंत जव्हार येथील गोखले एज्युकेशन सोसायटीचे महाविद्यालय येथे होणार असून महाविद्यालयातील प्राचार्य – डॉ – एम . आर .मेश्राम सर तसेच प्राध्यापक – आवळे सर यांच्या देखरेखीखाली संपन्न होणार आहे …. प्रतिनिधी जहीर शेख सह दर्शन पाडवी जव्हार।…….