
ऑनर लॅब कंपनी कडून दहा जिल्हा परिषद शाळांना एक हजार दप्तर वाटप..
दौंड- पुणे :- आलिम सय्यद
कुरकुंभ औद्योगिक वसाहत मधील ऑनर लॅब कंपनीने कंपनीच्या सीएसआर फंडातून दहा जिल्हा परिषद शाळांना एक हजार दप्तर वाटप करण्यात आली आहेत. यामध्ये कुरकुंभ , पांढरेवाडी, जधाववस्ती, झगडेवाडी, मुकादमवाडी, गिरमेवस्ती, भागवतवस्ती, अर्जुन नगर गिरीम, राघोबानागर, गोकुळनागर अशा दहा जिल्हा परिषद शाळांना कंपनीच्या माध्यमातून एक हजार दप्तर वाटप करण्यात आले आहे. तसेच २०१४ पासून अशा शाळेना कंपनीच्या माध्यमातून शालेय दप्तर वाटप करत असल्याची माहिती कंपनीचे व्यवस्थपाक दिपक कल्याणी यांनी दिली.
सदर कुरकुंभ जिल्हा परिषद शाळा येथे दप्तर वाटप करण्यात आले होते. शाळेतील विद्यार्थ्यांना दरवर्षी प्रमाणे या वर्षीही कंपनीच्या माध्यमातून दप्तर देण्यात आले. यावेळी कंपनी दरवर्षी प्रमाणे यावर्षीही शाळेला मोलाचे सहकार्य केल्याने सरपंच आयुब शेख यांनी कंपनीचे आभार मानले. यावेळी ऑनर लॅब कंपनीचे मुख्य अधिकारी मुनिराजा रेड्डी, व्यवस्थापक दीपक कल्याणी, दस्तगीर मुजावर, वेणू गोपाल , प्रशांत गांधी , तसेच कंपनीचे कर्मचारी, कुरकुंभ गावचे सरपंच आयुब शेख, उपसरपंच विनोद शितोळे, सुनील पवार, विजय गिरमे, नवनाथ गायकवाड, रफिक शेख, शांताराम जगताप , मुख्याध्यापक जयश्री कांबळे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष, विजय पवार, सर्व सदस्य , ग्रा.प. सर्व सदस्य. शाळेतील सर्व शिक्षक वर्ग विद्यार्थी व ग्रामस्थ उपस्थित होते .
बॉक्स
कंपनीच्या माध्यमातून आम्ही असे सामाजिक, शौक्षणिक, आरोग्य, कार्य करत आहोत. शौक्षणिक आरोग्य या बाबतीत आम्ही जास्त भर देत आलो आहे आणि देणार आहोत…
कंपनी व्यवस्थापक,
दीपक कल्याणी